पावसामुळे कांदा आवक घटण्याची चिन्हे
पावसामुळे कांदा आवक घटण्याची चिन्हे  
बाजारभाव बातम्या

पावसामुळे कांदा आवक घटण्याची चिन्हे

ज्ञानेश उगले

नाशिक : पावसाळी वातावरणात साठवणुकीतील कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढले असून, या स्थितीत नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या बाजारपेठेत आवक वाढली आहे. येत्या काळात कांद्याची आवक घटण्याची चिन्हे आहेत. कांद्याचे प्रतिक्विंटलचे दर ४०० ते १२०० व सरासरी १०५० या दरम्यान स्थिर आहेत. पुरवठा आणि मागणीचा विचार करता येत्या काळातही दर टिकून राहतील, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यात १५ बाजार समित्यांत व ४५ उपबाजारांत कांद्याची आवक होते. गतसप्ताहात लासलगाव बाजार समितीत कांद्याची आवक सरासरी २२ हजार क्विंटलची होती. दरम्यान कांद्याला या बाजार समितीत सरासरी ४५१ ते १२२५ व सरासरी १०५१ असे दर निघाले. याच दरम्यान पिंपळगाव बसवंत बाजार समितीत २२,७५० क्विंटलची आवक होती, तर प्रतिक्विंटलला ५०० ते १२६१ व सरासरी १०५१ रुपये दर मिळाले. उर्वरित बाजार समित्यांतही कांद्याची आवक व दराची स्थिती सर्वसाधारण सारखीच होती.

मागील महिन्याभरापासून कांद्याचे दर सरासरी १०५१ दरम्यान स्थिर आहेत. दरम्यान पावसामुळे साठवणुकीतील कांदा खराब होतोय. या स्थितीत येत्या महिन्यात कांद्याची आवक कमी होण्याची चिन्हे आहेत. बंगळूर येथील नवीन कांदा बाजारात येण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र त्याची आवक कमी आहे. या स्थितीत कांद्याच्या दरात अजून थोडीशी वाढ होईल, असा अंदाज जाणकारांमधून व्यक्त होत आहे. जागतिक मागणीची स्थिती पाहता कांद्याची निर्यात स्थिर आहे. ती येत्या काळातही स्थिर राहील, असे लासलगाव बाजार समितीचे सचिव बी. वाय. होळकर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT