खानदेशात केळी दरांवर दबाव वाढण्यास सुरुवात
खानदेशात केळी दरांवर दबाव वाढण्यास सुरुवात 
बाजारभाव बातम्या

खानदेशात केळी दरांवर दबाव वाढण्यास सुरुवात

ॲग्रोवन वृत्तसेवा

जळगाव : देशातील विविध भागांत टाळेबंदी, कोरोनासंबंधीचे निर्बंध लागू केले जात असल्याने खानदेशात केळी दरांवर दबाव वाढत आहे. विशेषतः कमी दर्जाच्या केळीचे दर गेल्या दोन दिवसांत क्विंटलमागे १०० ते १२५ रुपयांनी कमी झाले आहेत. परंतु ज्या भागात दर्जेदार केळी आहे, त्या भागात केळीची परदेशात निर्यात काही कंपन्या करीत आहेत.  रावेर येथून सध्या आठ कंटेनर (एक कंटनेर २० टन क्षमता) केळीची निर्यात केली जात आहे, तर खानदेशातून रोज ११ कंटेनर निर्यात परदेशात सुरू आहे. ही निर्यात आखातात अधिक होत आहे. परंतु कमी दर्जाच्या केळीची पाठवणूक खानदेशातून छत्तीसगड, नागपूर, राजस्थान, कल्याण, ठाणे, पुणे, नवी मुंबई, उत्तर प्रदेशासह इतर भागांत केली जाते. या केळीची खरेदी गेल्या दोन दिवसांपासून कमी दरात म्हणजेच ७५० ते ८५० रुपये प्रतिक्विंटल या दरात केली जात आहे.  मध्यंतरी केळीचे किमान दर ९०० रुपये ते ९२५ रुपये,असे होते. या केळीलाही उठाव होता. कारण टाळेबंदी कुठेही नव्हती. पण गेल्या दोन दिवसांत मध्य प्रदेशातील चार जिल्हे पूर्णतः लॉकडाउन केले आहेत. छत्तीसगड, नागपुरातही कडक निर्बध आहेत. शिवाय पुण्यातही प्रतिटाळेबंदी सुरू आहे. यामुळे केळीची मागणी कमी झाली आहे. परिणामी, किमान दरांवर दबाव वाढला आहे.  राज्यातही येत्या काही दिवसांत कोरोनाबाबत निर्बंध लागू केले जातील, असे संकेत शासनाने दिले आहेत. यामुळे राज्यातील मागणीवरही पुढे परिणाम होऊ शकतो. तसेच कोरोना निर्बंधांचे कारण सांगून पुढे कमी दरात केळी खरेदीचे प्रकारही सुरू होऊ शकतात, असे सांगितले जात आहे.   केळी काढणी जोमात... सध्या खानदेशात नंदुरबारमधील अक्कलकुवा, तळोदा, शहादा, जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर या भागांत केळीची अधिक काढणी सुरू आहे. प्रतिदिन २२० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीची आवक सुरू आहे. यात ७० टक्के केळी उत्तम दर्जाची असते. तर उर्वरित केळी कमी दर्जाची असते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT