Onion prices increase in Kolhapur since last week
Onion prices increase in Kolhapur since last week 
बाजारभाव बातम्या

कोल्हापुरात गतसप्ताहापासून कांदा दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्यास दहा किलोस २०० ते ९०० रुपये दर मिळाला. गेल्या सप्ताहापासून कांद्याच्या दरात वाढ होत असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. कांद्याची दररोज चार ते पाच हजार पोती इतकी आवक होत आहे. 

बाजार समितीत टोमॅटोच्या आवकेतही चांगलीच वाढ झाली. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत टोमॅटोची वीस ते पंचवीस टक्क्‍यांनी वाढ झाल्याची माहिती भाजीपाला विभागातून देण्यात आली. टोमॅटोची कर्नाटक सीमाभागातून जादा आवक होत आहे. टोमॅटोस दहा किलोस ३० ते १५० रुपये दर होता. पंधरवड्यापूर्वी सर्वत्र जोरदार पाऊस झाल्याने बहुतांश भाजीपाल्याची आवक रोडावली होती. 

शेतात पाणी साचून राहिल्याने सर्वच भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम झाला होता. आता ही आवक पूर्ववत होत आहे. सध्या पाऊस पूर्णपणे थांबल्याने याचा चांगला परिणाम भाजीपाल्याच्या वाढीवर होत आहे. यामुळे बहुतांशी भाजीपाल्याची आवक वाढत आहे. सप्ताहात वांग्याची आवकही सातत्याने एक हजार करंड्यावर राहिली. 

वांग्यास दहा किलोस १०० ते ४०० रुपये दर होता. ओली मिरचीची आठशे ते नऊशे पोती आवक झाली. ओली मिरचीस दहा किलोस १०० ते ३०० रुपये दर होता. भेंडीची सहाशे ते सातशे करंड्या आवक झाली. भेंडीस दहा किलोस ५० ते ३५० रुपये दर मिळाला. दोडक्‍याची तीनशे ते चारशे करंड्या आवक होती. दोडक्‍यास दहा किलोस १०० ते ३५० रुपये दर होता. काकडीच्या आवकेतही काहीशी वाढ होती. काकडीची दररोज तीनशे ते चारशे करंड्या आवक झाली. काकडीस दहा किलोस १०० ते २७० रुपये दर होता. गाजराची ८० ते ९० पोती आवक होती. गाजरास दहा किलोस १५० ते ६०० रुपये दर मिळाला. 

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची वीस ते पंचवीस हजार पेंढ्या आवक झाली. कोथिंबिरीस शेकडा १००० ते २००० रुपये दर होता. मेथीची सात ते आठ हजार पेंढ्याची आवक होतीे मेथीस शेकडा ८०० ते २२०० रुपये दर मिळाला. पालक, पोकळा, शेपूस शेकडा ११०० ते १२०० रुपये दर मिळाला. मका कणसाची दोन ते तीन हजार नगांची आवक झाली. मका कणसास शेकडा ५०० ते ९०० रुपये दर होता.

फळांमध्ये पेरूची दोनशे ते अडीचशे डाग आवक होती. पेरूस शेकडा ४०० ते १००० रुपये दर होता. डाळिंबाची दोनशे ते तीनशे कॅरेट आवक होती. डाळिंबास किलोस १५ ते ८५ रुपये दर मिळाला. सोलापूर भागातून बोराच्या आवकेसही सुरुवात झाली आहे. बोरास किलोस १० ते ३० रुपये दर होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भात गारपिटीचा इशारा

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

SCROLL FOR NEXT