नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक सर्वसाधारण; दरात सुधारणा कायम
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक सर्वसाधारण; दरात सुधारणा कायम 
बाजारभाव बातम्या

नाशिकला कांद्याची सर्वसाधारण आवक; दरात सुधारणा कायम

टीम अॅग्रोवन

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात उन्हाळ कांद्याची आवक ९७८८ क्विंटल झाली. बाजारभाव  ३२०० ते ४६०० प्रतिक्विंटल होते. मागणी वाढल्याने बाजारभाव वाढल्याचे दिसून आले. मात्र, मागील सप्ताहाप्रमाणेच आवक स्थिर आहे, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.

गतसप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी, तर काहींची आवक जास्त झाल्याने बाजारभाव सुद्धा कमी जास्त निघाले. वालपापडी घेवड्याची आवक ५०९७ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० दर मिळाला. घेवड्याला ४५००  ते ६००० प्रतिक्विंटल दर मिळाला. घेवड्याच्या दरात घट झाली आहे. हिरव्या मिरचीची आवक ११४५ क्विंटल झाली. मागणी वाढल्याने तिच्या भावात वाढ झाली. लवंगी मिरचीला १५०० ते २५००, तर ज्वाला मिरचीला १२०० ते २००० प्रतिक्विंटल दर मिळाला. वाटाण्याची आवक ५३५ क्विंटल झाली. आवक घटली असून बाजारभावात वाढ झाली. त्यास ११५०० ते १४०००  प्रतिक्विंटल दर मिळाला. 

बटाट्याची आवक ८५६५ क्विंटल झाली. त्यांना ७५० ते ११५०  प्रतिक्विंटल रुपये दर होते. लसणाची आवक २६६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ६००० ते १५५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. आल्याची आवक १४१ क्विंटल झाली. त्यास १२००० ते १५००० प्रतिक्विंटल दर मिळाला. चालू सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी जास्त झाली. बाजारभावात सुद्धा चढ उतार दिसून आला.

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला १५० ते ३७५,  वांगी २७० ते ५००, फ्लॉवर ८५ ते २६० असे प्रती १४ किलोस दर मिळाले. कोबीला ८० ते २०० प्रती २० किलोस दर मिळाला. ढोबळी मिरचीला २०० ते ४५० प्रती ९ किलोस दर मिळाला. भोपळा १७०  ते ३५०,  कारले १९० ते ३००, गिलके ३०० ते ४५०, भेंडी १४५ ते ३०० असे प्रती १२ किलोस दर राहिले. काकडीला  १८० ते ३००, लिंबू  ४०० ते १०००, दोडका ३७५ ते ६५० असे प्रती २० किलोस दर राहिले. 

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर ७०० ते ८८००,  मेथी ३०० ते २०००, शेपू १६०० ते ३५००, कांदापात ६४० ते २४००, पालक १७० ते ३१०, पुदिना १०० ते २२० असे प्रती १०० जुड्यांना दर मिळाले. फळांमध्ये चालू सप्ताहात डाळिंबाची आवक ७००८ क्विंटल झाली. आवक कमी झाली आणि मागणी वाढल्याचे दिसून आले. बाजारभाव किंचित वाढलेले दिसून आले. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ५०० ते ५५०० व मृदुला वाणास ७५० ते १६७५० प्रतिक्विंटल दर मिळाला. केळीची आवक ४०० क्विंटल झाली. तिला  ५०० ते ११०० प्रतिक्विंटल दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT