Minor improvement in banana prices in Khandesh
Minor improvement in banana prices in Khandesh 
बाजारभाव बातम्या

खानदेशात केळीच्या दरात किरकोळ सुधारणा

टीम अॅग्रोवन

जळगाव : खानदेशात केळीची मागणी कायम आहे. दरात क्विंटलमागे ३० रुपयांची सुधारणा झाली. किमान ७९०, तर कमाल ११९ रुपये प्रतिक्विंटलचे दर केळीला मिळत आहेत. 

कांदेबाग केळीचे दर रावेर, चोपडा येथील बाजार  समिती जाहीर करीत आहे. रावेर बाजार समितीतर्फे कांदेबाग केळीला ११९० रुपये प्रतिक्विंटल, तर जळगाव भागात ११८० रुपये प्रतिक्विंटलचे दर बुधवारसाठी (ता.१६) जाहीर झाले. कमी दर्जाच्या केळीचे दरही ६५० ते ७०० रुपये  प्रतिक्विंटल होते. त्यात चांगली सुधारणा झाली. ७९० रुपये प्रतिक्विंटलचा दर कमी दर्जाच्या केळीला जागेवर मिळत आहे.

दर्जेदार कांदेबाग केळीचे दर मागील आठवड्यात प्रतिक्विंटल ११६० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. त्यात या आठवड्यात सुधारणा झाली आहे. 

कांदेबाग केळीची काढणी खानदेशात पूर्ण होत आली आहे. तर, आगाप लागवडीच्या मृग बहार केळीची काढणी रावेरातील तांदलवाडी व परिसरात सुरू झाली आहे. तेथून केळीची परराज्यासह परदेशात निर्यात किंवा पाठवणूक सुरू आहे. 

कांदेबाग  केळीची काढणी जळगाव जिल्ह्यात चोपडा, जळगाव, पाचोरा, जामनेर या भागात तर धुळ्यातील शिरपुरात सुरू आहे. मध्यंतरी काढणी रखडली होती. परंतु मंगळवारी (ता.१५) काढणी सुरू झाली. रावेर, मुक्ताईनगर, यावल या भागात केळीची आवक अजूनही हवी तशी नाही. सध्या जळगाव जिल्ह्यात रोज १३० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीची आवक सुरू आहे. आवक या महिन्यात कमी झाली आहे. 

काढणीला येणार वेग

उत्तरेकडून म्हणजेच दिल्ली, जम्मू या भागातून केळीची मागणी कायम आहे. केळीला नोव्हेंबरमध्ये सरासरी ९०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. या महिन्यात दर अधिक मिळू शकतात, असा अंदाज आहे. वातावरण स्वच्छ सूर्यप्रकाशीत झाल्यानंतर केळीच्या काढणीला आणखी वेग येईल, अशी स्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lemon Rate : लिंबाचे दर पोहोचले ६,५०० रुपयांवर

Hirda Picking : जुन्नर तालुक्यात हिरडा गोळा करण्याची लगबग

Yedgaon Dam Victim : येडगाव धरणग्रस्त शेतकऱ्यांसाठी धरणात पाणीसाठा राखून ठेवावा

Interview with PM Narendra Modi : आर्थिक विकासाची महाराष्ट्रासाठी ‘गॅरंटी’

Sugar Market : कोट्यापेक्षा जादा साखर विक्री कारखान्यांना पडली महागात

SCROLL FOR NEXT