गवार
गवार 
बाजारभाव बातम्या

कोल्हापुरात गवार तेजीत

Raj Chougule

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात गवारीचे दर तेजीत राहिले. गवारीस दहा किलोस ३५० ते ४०० रुपये दर मिळाला. गवारीची आवक घटल्याने दराची तेजी कायम असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. ओल्या मिरचीची दररोज दोनशे ते तीनशे पोती आवक झाली. ओल्या मिरचीस दहा किलोस १५० ते २५० रुपये दर मिळाला. ओल्या मिरचीचे दर गेल्या पंधरा दिवसांपासून स्थिर आहेत. वांग्याची दररोज तीनशे ते चारशे पोती आवक होती. वांग्यास दहा किलोस १०० ते २४० रुपये दर मिळाला. महिन्यापूर्वी वांगी व टोमॅटोच्या दरात चांगलीच तेजी होती; परंतु गेल्या महिन्यापासून आवकेत वाढ झाल्याने दराची तेजी कायम राहू शकली नाही. टोमॅटोच्या आवकेत गेल्या पंधरवड्याच्या तुलनेन पंधरा ते वीस टक्के वाढ झाल्याने टोमॅटोस दहा किलोस ५० ते १२० रुपये दर मिळत आहे. ओल्या वाटाण्याची दररोज दोनशे ते तीनशे पोती आवक होत आहे.  ओल्या वाटाण्यास दहा किलोस २०० ते ३५० रुपये दर मिळत आहे. वाटाण्याचा दर स्थिर आहे. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची दररोज चौदा हजार पेंढ्या आवक झाली. कोथिंबिरीस शेकडा २०० ते ४०० रुपये दर होता. कोथिंबिरीच्या दरात कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नसल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. शेवगा शेंगेच्या आवकेत चांगलीच घट झाली आहे. शेवगा शेंगेस दहा किलोस ५०० ते ७०० रुपये दर मिळाला.  कांदा पातीला दररोज एक ते दीड हजार रुपये दर मिळाला. मेथीच्या आवकेतही चांगलीच वाढ झाल्याने मेथीचे दरही कमी झाले. मेथीस शेकडा १५० ते २५० रुपये दर मिळाला. पालकला पेंढीस १५० ते  २०० रुपये दर होता. सांगली जिल्ह्यातून द्राक्षाची दररोज शंभर बॉक्‍स आवक झाली. द्राक्षास किलोस १५ ते ३० रुपये दर मिळाला. डाळिंबाची दररोज वीस ते पन्नास कॅरेट आवक झाली. डाळिंबास किलोस १० ते ४० रुपये दर होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Scarcity : वरणगावात १५ दिवसांआड पाणीपुरवठा; नागरिक त्रस्त

Landslides : जम्मू-काश्मीरमध्ये भूस्खलनामुळे घरे कोसळली; ५०० हून अधिक लोकांचे स्थालांतर

Wrestling : आणि कुस्ती शौकीनांच्या ह्रदयाची धडधड वाढायला लागते

Banana Farmer Issue : मेगारिचार्ज योजनेसह केळीचे प्रश्‍न प्रलंबित

Water Scarcity : पाण्याच्या आशेने करमाळ्यात विहिरींची खोदाई

SCROLL FOR NEXT