Guar in Jalgaon Rs. 2000 to 4000 per quintal
Guar in Jalgaon Rs. 2000 to 4000 per quintal 
बाजारभाव बातम्या

जळगावात गवार २००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता. ७) गवारीची तीन क्विंटल आवक झाली. गवारीला २००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. आवक जळगाव जिल्ह्यातील जामनेर, एरंडोल, पाचोरा, धुळे आदी भागातून होत आहे. 

बाजारात मंगळवारी हिरव्या मिरचीची १६ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल १८०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. पालकाची दीड क्विंटल आवक झाली. पालकाला प्रतिक्विंटल १४०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची १३ क्विंटल आवक झाली. टोमॅटोला प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाला.बीटची सहा क्विंटल  आवक झाली. बीटला प्रतिक्विंटल १४०० ते २२०० रुपये दर होता. 

काशीफळांची १७ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाला. मेथीची पाच क्विंटल आवक झाली. मेथीला प्रतिक्विंटल १८०० ते ३४०० रुपये दर मिळाला. गिलक्‍यांची नऊ क्विंटल आवक झाली. गिलक्यांना प्रतिक्विंटल १७०० ते २५०० रुपये दर मिळाला. भेंडीची १६ क्विंटल आवक झाली. भेंडीला प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर होता. आल्याची २४ क्विंटल आवक झाली. दर २८०० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. 

वांग्यांना १२०० ते १८०० रुपये

लहान काटेरी वांग्यांची १५ क्विंटल आवक झाली. वांग्यांना प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर होता.  शेवगा शेंगांची पाच क्विंटल आवक झाली. शेवगा शेंगांना प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाला. 

भोपळ्याची ११ क्विंटल आवक

भोपळ्याची ११ क्विंटल आवक झाली. कोबीची १८ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १६०० ते २३०० रुपये असा होता. भोपळ्याला प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाला. तोतापुरी आंब्यांची १८ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल २५०० ते ५५०० रुपये होता. दोडक्‍यांची ११ क्विंटल आवक झाली. दोडक्‍याला प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

SCROLL FOR NEXT