हिरवी मिरची
हिरवी मिरची 
बाजारभाव बातम्या

सोलापुरात हिरवी मिरची, गवार, वांग्याचे दर वधारले

Sudarshan Sutaar

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरवी मिरची, गवार, वांग्याला मागणी राहिली. त्यांचे दरही वधारल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. गतसप्ताहात बाजार समितीच्या आवारात गवारची रोज १० ते १५ क्विंटल, वांग्याची ३५ ते ४० क्विंटल आणि हिरव्या मिरचीची ८० क्विंटल आवक राहिली,  ही सगळी आवक  स्थानिक भागातूनच झाली. पण मागणी चांगली असल्याने त्याला उठावही मिळाला. गवारला प्रतिदहा किलोसाठी १७० ते ४२५ व सरासरी २५० रुपये दर राहिला. वांग्याला १०० ते ४०० व सरासरी २०० रुपये आणि हिरव्या मिरचीला ८० ते ३०० व सरासरी १५० रुपये असा दर मिळाला. गेल्या दोन महिन्यांपासून गवार, वांगी, हिरवी मिरचीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत राहिले. पण या सप्ताहात त्यांच्या दरात आणि मागणीत काहीशी वाढ झाली. घेवड्यालाही या सप्ताहात चांगलाच उठाव मिळाला. घेवड्याची आवक रोज किमान ५ ते ७ क्विंटल राहिली. घेवड्याला प्रतिदहा किलोसाठी २५० ते ४०० व सरासरी ३५० रुपये असा दर राहिला. भाज्यांच्या दरातील तेजी या सप्ताहातही टिकून होती. विशेषतः कोथिंबिरीचे दर चांगलेच तेजीत होते. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी १००० ते १८०० रुपये, मेथीला १००० ते १२०० रुपये आणि शेपूला ६०० ते ८०० रुपये असा दर मिळाला.  कांद्याच्या दरात सुधारणा कांद्याच्या दरात या सप्ताहात चांगलीच सुधारणा झाली. कांद्याची आवक मुख्यतः स्थानिक भागातून झाली. बाहेरील आवक तुलनेने कमी राहिली. रोज सरासरी ४० ते ६० गाड्या इतकी आवक  झाली. पण कांद्याला मागणी राहिल्याने दरात सुधारणा झाली. कांद्याला प्रतिक्विंटल २०० ते २७०० व सरासरी १२०० रुपये असा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Crop Insurance : सोयाबीन पिकाला विम्याचा लाभ मिळालाच नाही

Pre Kharif Review Meeting : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी भरारी पथके नेमा

Sharad Pawar : सध्याचे केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात: शरद पवार

Mumbai Weather : मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे

SCROLL FOR NEXT