Green chillies in Aurangabad Rs 1600 to 2000 per quintal
Green chillies in Aurangabad Rs 1600 to 2000 per quintal 
बाजारभाव बातम्या

औरंगाबादमध्ये हिरवी मिरची १६०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. ८) हिरव्या मिरचीची आवक ७५ क्‍विंटल झाली. तिला १६०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी कांद्याची ७६७ क्‍विंटल आवक झाली. त्यांना ३०० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १३८ क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे  दर २०० ते ४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. फ्लॉवरची आवक ९७ क्‍विंटल, तर दर २०० ते ३०० रुपये  राहिला. ३८ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्यांचे दर ४०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. काकडीची आवक ७७ क्‍विंटल, तर दर ३०० ते ५०० रुपये राहिला. १६ क्‍विंटल आवक  झालेल्या भेंडीला १३०० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

कोबीची आवक ११० क्‍विंटल, तर दर २०० ते २५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १३ क्‍विंटल आवक झालेल्या लिंबांचे दर २०० ते २८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. दुधी भोपळ्याची १६ क्‍विंटल आवक झाली. त्यांना ४०० ते ५०० रुपये प्रतिक्‍विंटल दर राहिले. ११० क्‍विंटल आवक झालेल्या गाजराचा दर १००० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला.

वालशेंगांची आवक ८ क्‍विंटल, तर दर ४०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १२३ क्‍विंटल आवक झालेल्या वाटाण्यांचा  दर २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. शेवग्याची आवक ८ क्‍विंटल झाली. त्यांना ५००० ते ७००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ढोबळ्या मिरचीची आवक २० क्‍विंटल, तर दर ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

पालकाची आवक ९७०० जुड्यांची झाली. तर, दर २०० ते ३०० रुपये प्रतिशेकडा राहिले. १४५०० जुड्यांची आवक झालेल्या मेथीला ३०० ते ५०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT