grapes are available at Rs 2500 to 4300 per quintal  in Aurangabad
grapes are available at Rs 2500 to 4300 per quintal in Aurangabad 
बाजारभाव बातम्या

औरंगाबादमध्ये द्राक्षे २५०० ते ४३०० रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १) द्राक्षाची ३७ क्विंटल आवक झाली. त्यांना २५०० ते ४३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी हिरव्या मिरचीची ७० क्विंटल आवक झाली. तिला १५०० ते २२०० रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळाला. ६९९ क्विंटल आवक झालेल्या कांद्यांचे दर ४०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ८८ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोला तीनशे ते पाचशे रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला. वांग्यांची आवक २८ क्विंटल, तर दर ५०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल राहिले.

तीन क्‍विंटल आवक झालेल्या गावाला २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला. भेंडीची आवक ३० क्विंटल, तर दर १६०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल राहिले.  वाल शेंगांची आवक चार क्विंटल झाली. या वाल शेंगांना ७०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. ४२ क्विंटल आवक झालेल्या काकडीचे दर ४०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. लिंबांची आवक १३ क्विंटल, तर दर १४०० ते २००० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ६ क्विंटल आवक झालेल्या दुधीभोपळ्याला ४०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला.

कोबीची आवक ५५ क्विंटल, तर दर ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ५७ क्विंटल आवक झालेल्या फ्लॉवरला ६०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला. २४ क्विंटल आवक झालेल्या ढोबळी मिरचीला १००० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर मिळाला. गाजराची ४४ क्विंटल आवक झाली. त्यास ६०० ते १३०० रुपये दर मिळाला. वाटाण्याची आवक १६५ क्विंटल झाली. त्याला १००० ते २६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. २० क्विंटल आवक झालेल्या मोसंबीचे दर ७०० ते २४०० रुपये राहिले.

डाळिंबांची आवक २७ क्विंटल, तर दर १ हजार ते ५ हजार रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. पाच क्विंटल आवक झालेल्या अंजिराला ३००० ते ५५०० रुपये मिळाले. पेरूची आवक २७ क्विंटल. तर दर १००० ते १५०० रुपये राहिले. १३ क्विंटल आवक झालेल्या बोरांना ८०० ते १२०० रुपये दर मिळाला. 

पपईला ७०० ते १३०० रुपये

पपईची आवक २० क्विंटल झाली. तिला ७०० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ॲप्पल बोरांची आवक १४ क्विंटल, तर दर ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १७ हजार ५०० जुड्यांची आवक झालेल्या मेथीचे दर ४०० ते ५०० रुपये प्रतिशेकडा राहिले. पाच हजार ५०० जुड्यांची आवक झालेल्या पालकाला ३०० ते ४०० रुपये प्रति शेकडा दर मिळाला. कोथिंबिरीची आवक २४५०० जुड्यांची झाली. तिला ८० ते २३० रुपये प्रतिशेकडाचा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT