फुल आवक
फुल आवक 
बाजारभाव बातम्या

सोलापुरात फुलबाजारात तेजी

Sudarshan Sutaar

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात दिवाळीमुळे फुलबाजार चांगलाच तेजीत राहिला. विशेषतः झेंडू, गुलाब आणि शेवंतीला सर्वाधिक उठाव मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात झेंडूची १०० ते २०० क्विंटलपर्यंत असणारी आवक एक-दोन गाड्यांपर्यंत झाली; तर गुलाब आणि शेवंतीची प्रत्येकी एक गाडीपर्यंत आवक झाली. गेल्या काही दिवसांत अगदी काही मोजकी असणारी आवक या सप्ताहात चांगलीच वाढली. सप्ताहाच्या सुरवातीलाच दिवाळीचा उत्सव सुरू झाल्याने फुलांना मागणी वाढली. सप्ताहाच्या शेवटपर्यंत फूलबाजार त्यामुळे तेजीत राहिला. दसऱ्यानंतर पहिल्यांदाच झेंडूला पुन्हा एकदा उठाव मिळाला. दसऱ्यामध्ये झेंडूला प्रतिकिलोसाठी ८० ते १०० रुपये असा दर मिळाला; पण या सप्ताहात दिवाळीमुळे झेंडूचा दर १०० ते १२० रुपयांपर्यंत वधारला.  शेवटच्या दोन दिवसांत लक्ष्मीपूजन आणि पाडव्याला तर खूपच मोठी मागणी वाढली. त्याशिवाय गुलाबाला प्रतिकिलो ५० ते ८० रुपये आणि शेवंतीलाही ५० ते ७० रुपये असा दर मिळाला. भाजीपाल्यामध्येही कोथिंबिरीला सर्वाधिक उठाव मिळाला. त्यानंतर मेथी, शेपूचे भाव वधारलेले राहिले.  भाज्यांची आवकही रोज जेमतेम आठ-दहा हजार पेंढ्यांपर्यंत राहिली. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी २००० रुपये, मेथीला १५०० रुपये आणि शेपूला ७०० रुपयांपर्यंत दर मिळाला. फळभाज्यामध्ये टोमॅटो, वांगी, ढोबळी मिरचीला पुन्हा उठाव मिळाला. फळभाज्यांची आवक स्थानिक भागातूनच झाली. रोज त्यांची प्रत्येकी एक-दोन गाड्या अशी आवक झाली. टोमॅटोला प्रतिदहा किलोसाठी १५० ते २५० रुपये, वांग्याला १०० ते १७० रुपये आणि ढोबळी मिरचीला १५० ते ३०० रुपये असा दर मिळाला. कांद्याचे दर याही सप्ताहात टिकून पण तेजीत राहिले. कांद्याची आवकही पुन्हा कमीच होती. रोज ५० ते ६० गाड्या इतकी आवक झाली. कांद्याला प्रतिक्विंटल किमान २०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक २२०० रुपये असा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT