drumstick 20000 rupees per quintal in Nagar
drumstick 20000 rupees per quintal in Nagar 
बाजारभाव बातम्या

नगरमध्ये शेवग्याला प्रतिक्विंटल सरासरी १७ हजार दर

टीम अॅग्रोवन

नगर ः नगरसह राज्यामधील अनेक बाजार समितीत सोमवारी (ता. ३१) शेवग्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेवग्याला प्रतिक्विंटल पंधरा ते वीस हजार व सरासरी सतरा हजार पाचशे रुपये विक्रमी दर मिळाला. नगरमध्ये आतापर्यंत शेवग्याला मिळालेला हा सर्वाधिक दर आहे. त्यामुळे कांद्यापाठोपाठ शेवग्यानेही दरात कमालीची उचल खाल्ली आहे. 

नगर जिल्ह्यामध्ये ऊसासोबत भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. गेल्या दोन वर्षांपासून मात्र शेती अडचणीत आहे, त्यासोबत भाजीपाला, फळ उत्पादनही अडचणीत आहे. गेल्यावर्षी दुष्काळात फळबागांचे नुकसान झाले. त्याचा मोठा फटका शेवगा उत्पादनाला बसला. शिवाय थेट उत्पादन देणाऱ्या शेवग्याच्या बागांचे आक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीतही अनेक भागात नुकसान झाले. शिवाय यंदाच्या पावसाळ्यानंतर लागवड केलेल्या शेवग्याला सद्यःस्थितीत फुले लागली आहे. 

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत नगरसह शेजारच्या सोलापूर, बीड, औरंगाबाद व पुणे जिल्ह्यामधील काही भागातून शेवगा विक्रीला येत असतो. दर रोज येथे साधारण पंचवीस ते चाळीस क्विंटलपर्यंत आवक होत असते. सध्या बाजार समितीत आवक कमी आहे. सोमवारी केवळ ८० किलोची आवक झाली. मात्र, प्रतिक्विंटलला पंधरा ते वीस हजार व सरासरी सतरा हजार पाचशे रुपये विक्रमी दर मिळाला. नगरसह राज्यातील अनेक बाजार समितीत शेवग्याची आवक कमी झाली असून दरात कमालीची तेजी झाली आहे. 

मागील आठ दिवसांत साधारण चार ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला होता. मात्र, आज हा दर थेट वीस हजारांवर गेला. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच दोनशे रुपये प्रतिकिलोला घावूक दरात दर मिळाला आहे. नगरसह राज्यभरात कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या साधारण एक हजारापासून दहा हजारांपर्यंत नव्या कांद्याचे दर टिकून आहेत. आता कांद्यापाठोपाठ शेवग्याच्या दरानेही तेजी घेतली आहे.

नगर बाजार समितीत नगरसह राज्याच्या काही भागातून शेवगा येतो. मात्र, अलीकडच्या पंधरा दिवसांपासून आवकेत घट झाली आहे. आवक कमी असल्याने दराने उचल खाल्ली आहे. अजून महिनाभरात आवकेत वाढ होण्याचा अंदाज आहे. - अभय भिसे, सचिव, बाजार समिती, नगर   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT