अकोट बाजारसमितीत कापसाची झालेली आवक
अकोट बाजारसमितीत कापसाची झालेली आवक 
बाजारभाव बातम्या

अकोट बाजारात कापसाला ५८०० रुपयांपर्यंत दर

टीम अॅग्रोवन

अकोला  ः वऱ्हाडातील कापसाची प्रमुख बाजारपेठ म्हणून उदयाला अालेल्या अकोट बाजारात कापसाला ५६०० ते ५८०० रुपये क्विंटलदरम्यान दर मिळाला. कापसाच्या दरात साधारणपणे १०० रुपयांनी वाढ झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. येथे मंगळवारी (ता. ११) सुमारे तीन हजार क्विंटलपेक्षा अधिक कापसाची अावक झाली.

अकोट  बाजार समितीत भरणाऱ्या कापूस बाजारात अकोला जिल्ह्यासह इतर भागांतून अावक होत असते. या हंगामात कापसाला सातत्याने पाच हजारांवर दर मिळत अाहे. चालू हंगामासाठी शासनाने मध्यम धाग्याच्या कापसाला ५१५० तर लांब धाग्यासाठी ५४५० रुपये दर जाहीर केलेला अाहे. या दोन्ही दरांपेक्षा अधिक भाव खुल्या बाजारात व्यापाऱ्यांकडून दिला जात अाहे. येत्या काळात अाणखी दर वाढीची शक्यता वर्तविली जात अाहे.

गेल्या अाठवड्यात कापसाची येथील अावक सरासरी दोन हजार क्विंटलपर्यंत होती. त्यात अाता हळूहळू सुधारणा होऊ लागली अाहे. शिवाय दरांमध्येही वाढ दिसून येत अाहे. यावर्षी अनियमित पावसामुळे कोरडवाहू कापूस क्षेत्रात उत्पादनाला फटका बसलेला अाहे. सार्वत्रिक उत्पादन घटल्याने बाजारात कापसाची मागणी अधिक अाहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Scarcity : पाण्यासाठी महिलांची एक किमी पायपीट

Onion Export : कांदा निर्यातीची खोटी बातमी देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल - अनिल घनवट

Beed Lok Sabha : बीडमध्ये ५५ वैध उमेदवार; छाननीअंती १९ उमेदवार बाद

Water Storage : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Green Hydrogen Project : हिमाचल प्रदेशच्या झाकरीत देशातील पहिला हरित हायड्रोजन प्रकल्प

SCROLL FOR NEXT