कोथिंबीर
कोथिंबीर 
बाजारभाव बातम्या

नाशिकमध्ये कोथिंबिरीला मागणी वाढली

ज्ञानेश उगले

नाशिक : नाशिक बाजार समितीत गत सप्ताहात दिवाळीचा उत्साह असल्याने कोथिंबिरीला प्रति शेकडा २००० ते २७,००० व सरासरी १५,००० रुपये दर मिळाले. यावेळी आवक अवघी ८,००० जुड्यांची राहिली. पावसाच्या तडाख्याने पालेभाज्यांचे नुकसान झाले. दिवाळीत मागणी वाढली मात्र आवकच अत्यल्प झाली. परिणामी कोथिंबिरीला शेकडा २७ हजारपर्यंतचे तेजीचे दर मिळाले. या हंगामातील हे उच्चांकी दर असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या पंधरवड्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले असून, त्यामुळे दिवाळीच्या कालावधीत कोथिंबिरीच्या बाजारभावाने उच्चांक गाठला. शनिवारी (ता.२१) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर २० हजार रुपये शेकडा दराने विक्री झाली. मात्र रविवारी (ता. २२) आजवरच्या दरांमध्ये सर्वांत उच्चांकी म्हणजे २७ हजार ५११ रुपये शेकडा जुडी असा भाव मिळाला आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने शेतातील उभे पीक नष्ट झाले आहे. पावसाचा सर्वाधिक फटका कोथिंबीरच्या उत्पादनाला बसला आहे. त्यामुळे नाशिक बाजार समितीत आवक घटली आहे. त्याचा परिणाम बाजारभावावर झाला. गुरुवारी (ता. १९) कोथिंबिरीची १८ हजार रु पये शेकडा दराने विक्री झाली होती, तर शुक्रवारी दर तेजीतच असल्याने १९ हजार रुपये शेकडा दर मिळाला होता. शनिवारी (ता.२१) कोथिंबीर बाजारभावाने चालू वर्षाचा उच्चांक मोडला. शनिवारच्या दिवशी कोथिंबीर तब्बल २० हजार रुपये शेकडा म्हणजेच २०० रुपये प्रतिजुडी दराने विक्री झाली. इतरवेळी साठ ते सत्तर हजार कोथिंबीर जुडीची आवक व्हायची तेथे आता सात ते आठ हजार जुड्यांची आवक झाली.  नाशिक बाजार समितीत दिंडोरी, कळवण तसेच सिन्नर तालुका व जवळपासच्या आदिवासी भागांतून आवक होत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सिन्नर तालुक्यातील ठाणगाव पाडळी येथील शेतकरी दुर्गेश रेवगडे यांनी शिवांजली व्हेजिटेबल कंपनीत आणलेली कोथिंबीर छोटू चव्हाण या व्यापायाने २० हजार रुपये शेकडा दराने खरेदी केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT