सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक वाढू लागली आहे. बुधवारी (ता. १४) हळदीची १४ हजार ३०४ क्विंटल आवक झाली. हळदीला ६००० ते १५,००० रुपये, तर सरासरी १०,५०० रुपये क्विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
बाजार समितीच्या आवारात कोल्हापुरी गुळाची १९२२ क्विंटल आवक झाली. गुळास २८०० ते ४१७१ रुपये, तर सरासरी ३४८६ रुपये क्विंटल दर होता. लाल मिरचीची आवक कमी अधिक प्रमाणात होती. लाल मिरचीची ३१६ क्विंटल आवक झाली. या मिरचीला ९००० ते १०,००० रुपये, तर सरासरी ९५०० रुपये क्विंटल दर मिळाला. परपेठ हळदीची ६२२१ क्विंटल आवक झाली. या हळदीला ५७०० ते ८००० रुपये सरासरी ६५५० रुपये क्विंटल दर होता.
विष्णू अण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम आवारात कांद्याची ३०५२ क्विंटल आवक झाली. कांद्याला २०० ते १००० रुपये क्विंटल दर होता. बटाट्याची १०७५ क्विंटल आवक झाली. बटाट्याला ७०० ते १००० रुपये क्विंटल दर मिळाला. लसणाची ९१ क्विंटल आवक झाली. लसणास २००० ते ४००० रुपये क्विंटल दर मिळाला.
फळांमध्ये मोसंबीची ७०० डझन आवक झाली. त्यास प्रतिदहा किलोस ३०० ते ५०० रुपये दर होता. डाळिंबाची २२३० डझन आवक झाली. डाळिंबास प्रति दहा किलोस २०० ते ५०० रुपये दर होता. चिकूची ९५६० डझन आवक झाली होती. चिकूला प्रति दहा किलोस १०० ते ४०० रुपये असा दर मिळाला. द्राक्षाची ८२८ (चार किलोची पेटी) पेटींची आवक झाली. द्राक्षाच्या प्रति पेटीस ८० ते १२० रुपये दर मिळाला. आल्याची १३ क्विंटल आवक झाली. आल्यास १५०० ते २५०० रुपये क्विंटल असा दर होता.