औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १७) मोसंबीची ७० क्विंटल आवक झाली. मोसंबीला २००० ते ४५०० रुपये क्विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
बाजार समितीमध्ये डाळिंबाची २० क्विंटल आवक झाली. डाळिंबाला २००० ते ८५०० रुपये क्विंटल दर मिळाला. चिकूची ५५ क्विंटल आवक झाली. चिकूला ५०० ते ९०० रुपये क्विंटल दर मिळाले. द्राक्षाची ६५ क्विंटल आवक झाली. द्राक्षाला ३००० ते ५५०० रुपये क्विंटल दर मिळाला. गाजराची १०६ क्विंटल आवक झाली. गाजराला ६०० ते ७०० रुपये क्विंटल दर मिळाला. बटाट्याची ७०० क्विंटल आवक झाली. बटाट्याला ५०० ते ८०० रुपये क्विंटल दर मिळाला.
मेथीची २० हजार जुड्या आवक झाली. मेथीला प्रतिशेकडा ३०० ते ४०० रुपये दर मिळाला. पालकाची २९ हजार जुड्या आवक झाली. पालकास १०० ते २०० रुपये प्रतिशेकडा दर मिळाला. कोथिंबिरीची ४० हजार जुड्या आवक झाली. कोथिंबिरीला १५० ते २५० रुपये शेकडा दर मिळाला. हिरव्या मिरचीची १९७ क्विंटल आवक आवक झाली. हिरव्या मिरचीचे दर २००० ते २५०० रुपये क्विंटल राहिले.
कांद्याची ४१४ क्विंटल आवक झाली. कांद्याला ५०० ते ७०० रुपये क्विंटल दर मिळाला. टोमॅटोची आवक १३३ क्विंटल होती. टोमॅटोला २०० ते ४०० रुपये क्विंटल दर मिळाला. वांग्याची ४१ क्विंटल आवक झाली. वांग्याला ५०० ते ६०० रुपये क्विंटल दर मिळाला. गवारीची ७ क्विंटल आवक झाली. गवारीला ४००० ते ५००० रुपये क्विंटल दर मिळाला. काकडीची १४० क्विंटल आवक झाली.
काकडीला ३०० ते ५०० रुपये क्विंटल दर मिळाला. भेंडीची ३८ क्विंटल आवक झाली. भेंडीला १००० ते १४०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. कोबीची १९० क्विंटल आवक झाली. कोबीला ३०० ते ४०० रुपये क्विंटल दर मिळाला. लिंबाची २१ क्विंटल आवक झाली. लिंबास २५०० ते ४५०० रुपये क्विंटल दर मिळाले.