carrots 1800 to 2500 rupees per quintal in Parbhani
carrots 1800 to 2500 rupees per quintal in Parbhani  
बाजारभाव बातम्या

परभणीत गाजर १८०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. १३) गाजराची १५० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटलला १८०० ते २५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

पालेभाज्यांमध्ये मेथीच्या ४५ हजार जुड्यांची आवक झाली. त्यांना प्रतिशेकडा २०० ते ४०० रुपये दर मिळाले. पालकाची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ५०० ते १००० रुपये दर मिळाले. शेपूची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १००० ते १५०० रुपये दर मिळाले. चुक्याची ६ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची १२५ क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटलला ८०० ते २००० रुपये राहिले. 

वेलवर्गीय भाज्यांमध्ये दोडक्याची १० क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला ३००० ते ५००० रुपये दर मिळाले. कारल्याची १५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला १५०० ते ३००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची २५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला ७०० ते १००० रुपये दर मिळाले. काकडीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ९०० क्रेट आवक, तर दर प्रतिक्रेटला १२५ ते २५० रुपये रुपये राहिले. 

शेंगवर्गीय भाज्यामध्ये वाटण्याची १०० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. गवारीची २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. चवळीची ६ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. वालाची १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १५०० ते २००० रुपये दर मिळाले. पातीच्या कांद्याची १० क्विंटल आवक, तर दर २००० ते ३००० रुपये मिळाले. वांग्यांची ४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २५०० रुपये दर मिळाले.

ढोबळ्या मिरचीची १० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटलला १५०० ते २००० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची ४० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये दर मिळाले. कोबीची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १२०० ते २००० रुपये मिळाले. भेंडीची २० क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटलला २००० ते ३००० रुपये मिळाले. लिंबांची २५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपये दर मिळाले. पेरूची ४० क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये मिळाले. बीट रुटची ३ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विटंलला १२०० ते २००० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT