डाळींब
डाळींब 
बाजारभाव बातम्या

नाशिकला डाळिंबाची आवक घटली

ज्ञानेश उगले

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील  बाजारात डाळिंबाची आवक ७० टक्‍क्‍यांनी घटली आहे. देशभरातील दिल्ली, कोलकता, जयपूर, इंदूर, अहमदाबाद, कानपूर, बंगळूर, चेन्नई या बाजारांतून स्थिर मागणी होत आहे. गत सप्ताहात नाशिक जिल्ह्यातील बाजारात डाळिंबाला प्रति २० किलो वजनाच्या क्रेटला १२०० ते १६०० व सरासरी १४०० रुपये दर मिळाले. अजून दोन महिने तरी डाळिंंबाचे दर स्थिर राहतील. फेब्रुवारीनंतर डाळिंबाला उठाव वाढेल, असे जाणकारांनी सांगितले.  नाशिक जिल्ह्यातील नाशिक बाजार समितीच्या पेठ रोड येथील शरदचंद्र पवार मार्केटमध्ये गत सप्ताहात रोज सरासरी १५०० क्रेटची आवक झाली. याच वेळी नाशिकच्या नांदूर भागातील परफेक्‍ट बाजार या डाळिंबाच्या खासगी बाजार समितीत १८०० क्रेटची आवक झाली. संपूर्ण जिल्ह्यात दररोज ३५०० क्रेटची आवक झाली. नोव्हेंबर महिन्यापासून ही आवक कमी कमी होत आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत या आवकेत ६० टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. सप्टेंबर महिन्यात ही आवक ५५०० क्रेटची होती. या स्थितीत परराज्यांतील बाजारपेठांत डाळिंबाला स्थिर मागणी असून, दरही स्थिर आहेत. ढगाळ पावसाळी वातावरणामुळे डाळिंब उत्पादक चिंतेत आहेत. या वातावरणामुळे पक्वतेच्या टप्प्यातील डाळिंबाची गुणवत्ता मिळण्यास अडचण येत आहे. देशभरातील फळ बाजारात डाळिंबाची आवक वाढली आहे. नाशिक भागातून दिल्ली, कोलकता, जयपूर, इंदूर, अहमदाबाद, कानपूर, बंगळूर, चेन्नई या बाजारपेठांत डाळिंब माल पाठवला जातो. या बाजारपेठांच्या स्थानिक भागांत डाळिंबाची लागवड वाढली असून, त्यामुळे बाजारात आवक वाढली आहे. गत सप्ताहातील डाळिंबाची दररोज आवक (क्रेट) : ३५००.  मिळालेले दर (प्रतिक्रेट) : १२०० ते १६०० व सरासरी १४०० रुपये प्रतिक्रिया डाळिंबाची लागवड देशभरात वाढलेली आहे. गुजरात आणि मध्य प्रदेश यात आघाडीवर आहे. या स्थितीत या सर्व भागांतून आवक वाढल्याने त्याचा बाजारावर परिणाम झाला आहे. ऑगस्टमध्ये पक्वतेच्या टप्प्यात झालेल्या पावसाने पिकाचे नुकसान झाले आहे. फेब्रुवारीदरम्यान डाळिंबाची आवक कमी होईल व उठाव वाढेल अशी स्थिती आहे. - किरण वाघ, प्रयोगशील डाळिंब उत्पादक.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT