अंडी
अंडी  
बाजारभाव बातम्या

थंडीमुळे अंड्याच्या दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन

अमरावती ः थंडीमुळे मागणी वाढल्याने अंड्याच्या दरात तेजीचा अनुभव येत आहे. कधी काळी १०० रुपये प्रतिक्रेट असलेली अंडी थंडीमुळे १३५ ते १३७ रुपये प्रतिक्रेट विकल्या जात असल्याची माहिती अंड्याचे घाऊक व्यापारी हिमांशू ठाकूर यांनी दिली.  विदर्भात तापमानात घट होत थंडी वाढीस लागली आहे. परिणामी अंड्यांना मागणी वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. अमरावती जिल्ह्यात आजच्या घडीला दरदिवशी सुमारे दहा लाख अंडी खवय्यांकडून फस्त केली जात असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. अंड्यांना मागणी वाढल्याचे परिणामी त्याचे दरही वाढले आहेत. सध्या एका क्रेट अंड्यासाठी १३५ ते १३७ रुपये मोजावे लागत आहेत. एका क्रेटमध्ये ३० अंडी राहतात. थंडीच्या काळात हेच दर राहतील, असा अंदाज असून फेब्रुवारीनंतर तापमानात जसजशी वाढ होईल तसे दरही कमी होतील. फेब्रुवारीनंतर प्रतिक्रेट १०० ते ११० रुपये असे दर राहण्याचा अंदाजही हिमांशू ठाकूर यांनी व्यक्‍त केला. प्रथिनेयुक्‍त अंडी ही हिवाळ्यात शरीरासाठी पोषक राहतात. ही बाब लक्षात घेता खवय्यांकडून अंड्यांना मागणी वाढली आहे. 

एका वर्षात २३० अंडी एका कोंबडीचे आयुष्य सरासरी दीड वर्षाचे राहते. एका वर्षात कोंबडी सरासरी २३० अंडी देते. यातील १६० अंडी ही खाण्याजोगी राहतात. लेयरच्या माध्यमातून ही अंडी तयार होतात. एका वर्षानंतर अंडी देणारी (लेयर) कोंबडी ही कटाईसाठी पाठविली जाते, असे विक्रेत्याने सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT