केळी दर
केळी दर 
बाजारभाव बातम्या

जळगावमध्ये नवती केळी ९७५ रुपये क्विंटलपर्यंत

Chandrakant Jadhav

जळगाव  ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील पाच दिवसांपासून ९७५ रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत. यातच अपेक्षित दर मिळत नसल्याने केळी उत्पादकांमध्ये नाराजी आहे.

यंदा केळीला अपेक्षित दर न मिळाल्याने लागवडीमध्ये काहीशी घट झाल्याचे दिसून आले. यंदा श्रावण महिना व गणेशोत्सवाच्या काळातही दर अपेक्षित प्रमाणात मिळाले नाहीत. या कालावधीत ११०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर होते. २३ ऑगस्टपर्यंत ११५० रुपये प्रतिक्विंटल दर होते. यानंतर दरात घट होत गेली. आता दर ९७५ रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत.

जिल्ह्यात नवती केळी फारशी नाही. तिच्या लागवडीमध्ये सातत्याने घट झाली आहे. तसेच पिलबागांमधील केळीही हवी तेवढी नाही; परंतु जिल्ह्यातून मुंबई, ठाणे, कल्याणपर्यंतच केळी जात आहे. गुजरात, मध्य प्रदेशातून केळीला असलेली मागणी कमी झाली आहे; तसेच दिल्ली येथेही अपेक्षित मागणी नसल्याने केळी कमी असतानाही तिची कापणी होत नसल्याची स्थिती आहे. सध्या रावेर, जळगाव व जामनेर परिसरात अधिकची नवती केळी आहे. चोपडा येथे कांदेबाग अधिक आहेत.

केळीचे दर रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे जाहीर केले जात आहेत; परंतु रावेर बाजार समितीच्या तुलनेत बऱ्हाणपूर येथील खासजी बाजारात केळीला क्विंटलमागे २०० ते ३०० रुपये अधिक दर आहेत. ही बाब लक्षात घेता अनेक केळी उत्पादक बऱ्हाणपूर येथे केळी पाठवित आहेत. दर्जेदार केळीचा उठाव अधिक आहे. तिची वाहतूक क्रेटमध्ये ट्रकद्वारे केली जात आहे. सध्या केळीला अपेक्षित दर मिळत नाहीत. वेळेत मालाची कापणी होत नाही. दरात मागील महिन्यापासून घसरण सुरू असल्याने केळी उत्पादकांना तोटा होत आहे, अशी माहिती करंज येथील केळी उत्पादक शालीक पाटील यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update : खुशखबर ! मॉन्सून ३१ मे पर्यंत केरळात होणार दाखल

Loksabha Election 2024 : कोण निवडून येणार? आकडेमोडीत गुंतले कार्यकर्ते

Crop Damage : माळीनगरची पिके पाण्याअभावी होरपळली

Pre Monsoon Rain : देवळा तालुक्यात वादळी पावसाने दाणादाण

Agriculture Funds : कृषी योजनांतून ३७ कोटींवर निधी खर्च

SCROLL FOR NEXT