Crop Disease  Agrowon
ताज्या बातम्या

Tur Pest : तुरीवर शेंगा पोखरणारी अळी

तेल्हारा तालुक्यातील माळेगाव महसूल मंडलात सध्या तुरीचे पीक फुलोरा, शेंगा परिपक्व होण्याच्या स्थितीत आहे.

Team Agrowon

दानापूर, जि. अकोला ः तेल्हारा तालुक्यातील माळेगाव महसूल मंडलात सध्या तुरीचे पीक फुलोरा, शेंगा परिपक्व (Tur Crop Disease) होण्याच्या स्थितीत आहे. परतीच्या पावसाने तूर चांगली बहरलेली आहे. अशातच तुरीच्या शेंगांना पोखरणारी अळी सर्वत्र दिसून येत आहे. तातडीने उपाययोजना, सल्ला मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

वातावरणातील बदलामुळे तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. किडीचे पतंग मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कळ्या व फुले लागल्यापासून तुरीच्या पिकांवर अळ्या दिसून येत आहेत. पिकांचे संरक्षण व्हावे, यादृष्टीने शेतकरी महागड्या कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत.

तरीही अळ्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. माळेगाव महसूल मंडलात यावर्षी तुरीचा पेरा हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. यामध्ये कपाशी ३ हजार हेक्टर, सोयाबीन २ हजार ४५० हेक्टर तर तूर १२१ हेक्टरवर आहे.

तुरीच्या पिकावर मोठी आशा होती. तुरीवर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने पीक हातातून जाते की काय असा प्रश्न आहे.

- अफसर खान बब्बू खान, शेतकरी, दानापूर, ता. तेल्हारा जि. अकोला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marathwada Rabi Sowing: मराठवाड्यात २८ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी

Kangayam Cattle: बैलपालक सौंदरम रामासामी

Mother Child Story: दृष्टीआडचे जग

Interview with Mohinder Bhagat: पंजाबला आता आस फलोत्पादन क्रांतीची

Water Is Life : सजीवांना जगवते ते पाणी...!

SCROLL FOR NEXT