Banana Agrowon
ताज्या बातम्या

Banana Production Workshop : केळी उत्पादन, हाताळणी, प्रक्रियेवर उद्या कार्यशाळा

केळी उत्पादन, पीक हाताळणी, साठवणूक, विक्री इत्यादीसाठी मॅग्नेट प्रकल्पांतर्गत विविध योजना कार्यान्वित आहेत.

Team Agrowon

Solapur Banana News : राज्याच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योगविभागांतर्गत आशियायी विकास बँक अर्थसाह्यित महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प (मॅग्नेट), राष्ट्रीय सुगीपश्‍चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे आणि ॲग्रोवन फार्म डीएमच्या संयुक्त विद्यमाने उद्या (ता. १०) गुरसाळे (ता. माळशिरस) येथे ‘केळी-पीक उत्पादन, सुगीपश्‍चात हाताळणी व प्रक्रिये’संबंधी कार्यशाळेचे (Workshop) आयोजन करण्यात आले आहे.

गुरसाळे येथील ‘अॅग्रोवन फार्म्स’वर सकाळी १० वाजता सहकार आणि पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, मॅग्नेट प्रकल्पाचे प्रकल्प संचालक दीपक शिंदे आणि ‘अॅग्रोवन’चे संपादक- संचालक आदिनाथ चव्हाण यांच्या उपस्थितीत या कार्यशाळेचे उद्‍घाटन होईल.

त्यानंतर टिश्युकल्चर केळी तज्ज्ञ संदीप जाधव, केळी निर्यातदार अझहर पठाण आणि प्रगतिशील शेतकरी कपिल जाचक हे तांत्रिक मार्गदर्शन करतील.

केळी उत्पादन, पीक हाताळणी, साठवणूक, विक्री इत्यादीसाठी मॅग्नेट प्रकल्पांतर्गत विविध योजना कार्यान्वित आहेत. याशिवाय गुणवत्ता, गॅप प्रमाणीकरणातील अडचणींच्या निवारण होण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा महत्त्वाची आहे.

याकरिताचे प्रवेश मर्यादित असून, येथे नोंदणी आवश्‍यक आहे. नोंदणीकरिता संपर्क : ज्ञानेश थोरात - ९६२३५३३०६९, संदेश कुलकर्णी- ९९२२८१९९२०

केळी फार्म भेट, पुस्तक प्रकाशन

अॅग्रोवन फार्ममधल्या केळी पिकाच्या सुगीपश्‍चात तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेण्याची संधी शेतकऱ्यांना या वेळी मिळणार आहे. तसेच ‘मॅग्नेट’च्या वतीने केळीवरील संपूर्ण माहिती असणाऱ्या केळी पीक माहिती पुस्तिकेचे प्रकाशन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Drone: सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतला ड्रोनचा लाभ

Zero Tillage Farming: शून्य मशागत, सेंद्रिय निविष्ठा निर्मिती ही काळाची गरज

Climate Change Impact: हवामानातील बदलाने काजू उत्पादक हवालदिल

Paddy Payment Delay: शेतकऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षाच!

Kerosene Allocation Approved: नाशिक जिल्ह्यास २.२८ लाख लिटर केरोसीन कोटा मंजूर

SCROLL FOR NEXT