Sugarcane  Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Labor : तीन वर्षे ऊसतोड केलेल्या कामगारांनी ओळखपत्रासाठी नोंदणी करावी

Sugarcane Labor Corporation : सतत कमीत कमी तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ ऊसतोडीचे काम केलेल्या ऊसतोड कामगारांनी गावच्या ग्रामसेवकाकडे ऊसतोड कामगार नोंदणी अर्ज भरून ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे

Team Agrowon

Parbhani News : सतत कमीत कमी तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ ऊसतोडीचे काम केलेल्या ऊसतोड कामगारांनी गावच्या ग्रामसेवकाकडे ऊसतोड कामगार नोंदणी अर्ज भरून ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त गीता गुठे यांनी केले.

ऊसतोड कामगारांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सहायक आयुक्त समाजकल्याण, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऊसतोड कामगारांसाठी पुनरागमन शिबिर ऊसतोड कामगारांना ओळखपत्र वाटप कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह येथे घेण्यात आले या वेळी त्या बोलत होत्या.

प्रादेशिक समाजकल्याण उपायुक्त जयश्री सोनकवडे यांच्या अध्यक्षस्थानी होत्या. गटविकास अधिकारी पीयूष केंद्रेकर, नंदिनी पानपट्टे, अनिता आसेवार, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी शिवानंद मिनगिरे, समाजकल्याण अधिकारी अमित घवले यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सुरेश गौतम हातागळे, सिद्धार्थ तुपसमुद्रे, प्रकाश हातागळे, नाना हातागळे, मुंजा सावळी, संतोष हातागळे (सर्व रा. वडगाव सुक्रे, ता. परभणी) या सहा ऊसतोड कामगारांना प्रातिनिधिक स्वरूपात ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.

तसेच वडगाव सुक्रे येथील ५९ ऊसतोड कामगारांना प्राधान्याने ओळखपत्र वाटप करणाऱ्या ग्रामसेविका जी. बी. काळे यांचा सोनकवडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शाहीर काशिनाथ उबाळे यांच्या पथकाचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain: पाऊस उघडीप देण्याची शक्यता; राज्याच्या बहुतांशी भागात पुढील ५ दिवस पाऊस कमी राहणार

Subsidy Fraud: अनुदान अपहारप्रकरणी सात कर्मचारी बडतर्फ 

Jal Jeevan Mission: सरकारकडून निधी न आल्याने ‘जलजीवन’ची बिले थकली

Sunflower Farming: खानदेशात सूर्यफुलाची पेरणी सुरू

Farmer Loan Waiver : 'पंतप्रधानांशिवाय देवा भाऊचं पानही हालत नाही...'; कॉंग्रेस खासदाराने संसदेत केली कर्जमाफीची मागणी

SCROLL FOR NEXT