Agriculture Business  Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Business : महिला शेतकऱ्यांनी गांडूळ खत निर्मिती उद्योग सुरू करावा

‘‘उत्पन्न वाढीसाठी जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांनी शेतीपूरक गांडूळ खतनिर्मिती उद्योग सुरू करणे गरजेचे आहे,’’ असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी केले.

Team Agrowon

परभणी ः ‘‘उत्पन्न वाढीसाठी जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांनी (Farmer) शेतीपूरक गांडूळ खतनिर्मिती उद्योग सुरू करणे गरजेचे आहे,’’ असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी केले.

कृषी विभाग, रिलायन्स फाउंडेशन, उमेदतर्फे शनिवारी (ता. १९) पंचायत समिती पाथरी येथे आयोजित एकात्मिक शेती पद्धती व गांडूळ खतनिर्मिती प्रशिक्षणात त्या बोलत होत्या. रावसाहेब परमार, दीपक दहे, रामप्रभू कोरके, ज्ञानेश्‍वर घाडगे, संदीप जाधव, अमोल खंडागळे, विजया ठेंगे, गणेश गिरी उपस्थित होते.

‘‘रासायनिक निविष्ठांच्या अतिवापराने जमिनीची सुपीकता, उत्पादकता कमी होत आहे. त्याचे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. त्यासाठी एकात्मिक शेती पद्धतीचा अंगीकार आवश्यक आहे.

महिला बचत गटांच्या मदतीने गावस्तरावर गांडूळ खतनिर्मिती करून त्याचे ब्रँडिंग, पॅकेजिंग, लेबलिंग व मार्केटिंगसाठी महिलांना, शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे.’’महिला शेतकऱ्यांना ६५ गांडूळ बेडचे वाटप रिलायन्स फाउंडेशनतर्फे करण्यात आले. ५ तालुक्यांत एकूण ३४५ गांडूळ बेडचे वितरण केले जाईल, असे या वेळी सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ७ निर्णय; ग्राम विकास आणि महसूल विभागाच दोन निर्णय

Cotton Farming : आपण बीजी-२ मध्ये अडकून पडलोय

Scorpion Bite : जनावरातील विंचू दंशावर उपाय

Cabinet Meeting : अतिवृष्टीग्रस्तांसाठी ११ हजार कोटी रुपयांच्या वितरणाचा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

Sugarcane Price Protest: कोल्हापुरात ऊसदर आंदोलन पेटले, अपेक्षित दर नाही अन् काटामारी, यड्रावकरांच्या कारखान्यांची ऊस वाहतूक रोखली

SCROLL FOR NEXT