Hailstorm Agrowon
ताज्या बातम्या

Hailstorm : हिंगणघाट तालुक्यात गारपीट, महिला जखमी

Latest Agriculture News गत दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या उकाड्यात हिंगणघाट तालुक्यात काही भागांत मध्यरात्री वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.

Team Agrowon

Wardha News : गत दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या उकाड्यात हिंगणघाट तालुक्यात काही भागांत मध्यरात्री वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यात चिकमोह गावातील १५ घरांवरील टीनपत्रे उडाले. तर एक महिला गंभीर जखमी झाली. सुमित्रा मेश्राम असे जखमी महिलेचे नाव आहे.

हिंगणघाट तालुक्यातील चिकमोह गावात मध्यरात्री नागरिक झोपेत असताना वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. त्यासोबतच मेघगर्जनेसह गारपिटीला सुरुवात झाली. या वादळात १५ घरांचे टीनपत्रे उडाली.

यामध्ये एका महिलेच्या पायावर दगड पडल्याने ती गंभीर जखमी झाली. तर दोन शेळ्यांचा मृत्यू झाला. अचानक झालेल्या चक्री वादळात नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या वादळी पावसात चंद्रशेखर रोठे, नंदा भोयर, मुस्कान मारुती चोरटे, महादेव मेश्राम, राजेंद्र तुळसे, अनिल तुळसे, गजानन रमेश ठाकरे, प्रमोद वावरे, दिनकर येटे, किशोर बायदे, भारत उबाड, राजेंद्र वांढरे, जयराम कुरसंगे, रमेशराव ठाकरे, समीर पिंद्रे यांच्या घराचे टीनाचे पत्रे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पावसामुळे अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तू भिजल्या. जवळपास तासभर चाललेल्या या वादळात विजेचे खांब कोसळून पडले. अनेक झाडे कोलमडली आहे. यात बांधकाम केलेली नवीन भिंत कोसळली.

घटनेची माहिती मिळताच सकाळी मंडळ अधिकारी, तलाठी, सरपंच यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा करून तहसीलदार हिंगणघाट यांना अहवाल पाठविला आहे. शासनाने तत्काळ नुकसान भरपाई देऊन आर्थिक मदत करावी, अशी मागणी पीडित नागरिकांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Muncipal Election: महानगरपालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान

Malegaon Khandaba Yatra: कुस्ती, पशू, कृषी स्पर्धांच्या बक्षिसात वाढ : चिखलीकर

Floriculture Development: काढणीपश्चात गुलाबांचा टिकवण कालावधी वाढणार

Poultry Farming: अभियंता तरुणाचे अभ्यासपूर्ण गावरान कुक्कुटपालन

Leopard Terror: जुन्नर वन विभागात ६८ बिबटे जेरबंद

SCROLL FOR NEXT