Vinayak Raut Agrowon
ताज्या बातम्या

Hailstorm Crop Damage : गारपीटग्रस्तांचा प्रश्न लोकसभेत मांडणार : विनायक राऊत

निफाड तालुक्यातील कुंभारी, पालखेड, नांदुर्डी, रानवड या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पाऊस व गारपिटीने द्राक्ष, कांदा यासह शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Nashik News नाशिक : निफाड तालुक्यातील कुंभारी, पालखेड, नांदुर्डी, रानवड या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पाऊस (Unseasonal Rain) व गारपिटीने (Hailstorm) द्राक्ष, कांदा यासह शेती पिकांचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले आहे.

शेतकरी बांधवांच्या समस्यांबाबत सरकारने त्वरित निर्णय घ्यावेत. गारपीटग्रस्तांचा प्रश्न लोकसभेत मांडणार असल्याचे आश्वासन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी शेतकऱ्यांना दिले.

मालेगाव येथे जात असताना खासदार राऊत यांनी त्यांचा ताफा निफाड तालुक्यातील गारपीटग्रस्त भागात वळवला. कुंभारी येथे वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीने द्राक्ष, कांदा पिकांच्या झालेल्या नुकसानची पाहणी केली.

या वेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुधाकर बडगुजर आदी शेतकरी, शिवसेनेचे स्थानिक नेते उपस्थित आहे. नुकसानाग्रस्त शेती पिकांची पाहणी केल्यानंतर, आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला मदतीसाठी लोकसभेत मुद्दा मांडणार आहोत, असे त्यांनी सांगितले. शिवसेना नाशिक जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात राऊत यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली.

त्या वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, केवळ पंचनामे करून चालणार नाही तर घेतलेले कर्ज पुनर्गठन करताना योग्य विचार करावा. मुख्यमंत्री शंभर टक्के नुकसान भरून देऊ असे सांगत आहेत.

निर्यातक्षम द्राक्षांचा खर्च हा एकरी अडीच ते तीन लाख रुपये आहे. त्यामुळे शासनाला शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत पत्र लिहून दिलेला शब्द पाळावा. आजच्या बाजारभावानुसार मदतीची मागणी करणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sunflower Farming: वाणगावात सूर्यफुलाची शेती बहरली

Hapus Mango Fraud: हापूसच्या नावाने फसवणूक

Wheat Market: गव्हाची वाढली आवक, पण ज्वारीने खाल्ला भाव

Floriculture Project: विद्यापीठामध्ये आठ एकरवर फुलपिके संशोधन, व्यावसायिक फुलशेती प्रकल्प

Women Empowerment: औसा तालुक्यातील चाळीस गावात महिला अस्मिता भवन

SCROLL FOR NEXT