Traditional Agriculture Agrowon
ताज्या बातम्या

Traditional Agriculture : शेतीतले जुने ठोकताळे आता खरे का ठरत नाहीत ?

सकाळचं फिरणं, थोडासा व्यायाम केल्याशिवाय जसा दिवस सुरू होत नाही,तसाच हा काळा चहा पिल्याशिवाय चैन पडत नाही. असा चहा जगातही दुसरा कोणी पित नसेल !

महारुद्र मंगनाळे

लेखक- महारुद्र मंगनाळे

सकाळचं फिरणं, थोडासा व्यायाम केल्याशिवाय जसा दिवस सुरू होत नाही,तसाच हा काळा चहा पिल्याशिवाय चैन पडत नाही. असा चहा जगातही दुसरा कोणी पित नसेल!  पाण्यात आधी छोटा अर्धा चमचा हळद टाकायची,ती उकळल्यावर त्यात अर्धा चमचा चहा पत्ती टाकायची. तो गोड लागेल एवढा गुळ टाकायचा आणि तुळशीची आठ-दहा पानं टाकून ती उकळायची. याची चव मला इतर कुठल्याही चहापेक्षा आवडते. हा चहा मला फक्त रुद्रा हटमध्येच मिळतो. मी स्वत:बनवतो. 

गवतावर मोठ्या प्रमाणावर दव पडू लागलं की, समजलं जायचं की पावसाळा संपला. आणि तसचं घडायचं. शेतीमध्ये पिढ्या न् पिढ्यांच्या अनुभवातून काही ठोकताळे तयार झाले होते. कधी पाऊस पडणार, कधी थांबणार. कुंभारी वारे सुरू झाले की, पाऊस लांबणार. उन्हाळा किती तीव्र आहे, यावर पाऊस कमी पडणार की जास्त याचा अंदाज....असे अनेक ठोकताळे. ते अपवाद सोडले तर, तंतोतंत खरे ठरायचे.

पण गेल्या दशकापासून हे सगळं झपाट्याने बदलतंय. मायीशी बोलताना, या सगळ्या बाबींची सविस्तर चर्चा व्हायची. आम्ही या निष्कर्षाला यायचो की, निसर्गाचं चक्र बदललयं. आता पूर्वीसारखं घडत नाही. आता तर विज्ञानालासुध्दा नीट कारणमिमांसा करुन अंदाज बांधणं अवघड झालयं.

सकाळी फिरायला निघाल्याबरोबर सगळ्या गवतावरील चंदेरी-सोनेरी रंगाच्या नयनरम्य दवाने माझं लक्ष वेधून घेतलं.त्या गवतातून चालताना पाण्याचा हळूवार स्पर्श पायांना गुदगुल्या करीत होता. तेव्हा सुरू झालेलं विचारचक्र भुतकाळात घेऊन गेलं. शेततळ्यावर एक सुंदर पक्षी दिसला तेव्हा ही विचारतंद्री भंगली. फोटो काढायला पुढे सरकेपर्यंत तो पक्षी उडून गेला.

मी मनात म्हटलं, माणसंही अशीच भूरकन उडून जातात, पुन्हा कधीच न परतण्यासाठी. माझं लक्ष समोर माईच्या बागेकडं गेलं. बघता बघता ११ महिने झाले मायीला जाऊन. ती समोरच असते, वावरते, बोलते.. तरीही तो आभासच असतो.. आभास वास्तवात नाही उतरतं...

सकाळी काही मित्रांशी बोलणं झालं. त्यांना शेतीचं दुखणं सांगितलं. काही झालं तरी, माणूस आणि निसर्गावर अवलंबून असलेल्या या शेतीतून मला बाहेर पडायचंय. त्याचा शोध घेतोय. मार्ग नक्कीच सापडेल. परवा एका फेसबुक मित्राने रुद्रा हटचा फोटो टाकण्याची विनंती केली होती. माळावर फिरताना मी बरेच फोटो काढले. पण घरालगतच्या चिंचेच्या दोन झाडांमुळे रुद्रा हट दिसतच नाही. हटच्या चारही बाजुंनी झाडंच आहेत. आतमध्ये समोर आल्याशिवाय हट दिसणार नाही.

नाही तरी ती कोणाला दिसू नये असचं वाटतं. हे आमचं जग आहे. या जगात इतरांचा वावर मला नको आहे. शिवाजीला बोलताना मी म्हटलं,२४ तास इथं मी ज्या शुद्ध हवेत जगतोय,त्याची किमत तू पैशात कशी करणार? कुठल्याही पंचतारांकित वा सप्ततारांकीत हॉटेलमध्ये वा पर्यटनस्थळी ही हवा मिळणार नाही. माणसांचे पाय लागले की, निसर्ग बिघडला असंच समजायचं!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT