Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : राज्यात गारठा कायम

निफाड येथे पारा नीचांकी १२.४ अंशांवर

Team Agrowon

पुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. किमान तापमान (Minimum Temprature) २० अंशांखाली आल्याने पहाटे गारठा कायम आहे. तर दुपारी उन्हाचा चटका बसत आहे. शनिवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये निफाड (Niphad) येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. ३०) राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर, तसेच विषूववृत्ताजवळील बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. तर ईशान्येकडील वारे सक्रिय झाल्याने शनिवारी (ता. २९) दक्षिण भारतातील राज्यांमध्ये ईशान्य मोसमी वाऱ्यांच्या (ईशान्य मॉन्सून) हंगामाला सुरुवात झाली आहे.

उत्तरेकडून वाहणारे थंड व कोरड्या वारे पोषक ठरल्याने राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. तर दिवसा असलेल्या निरभ्र आकाशामुळे स्वच्छ सूर्य प्रकाश जमिनीवर येऊन उन्हाची ताप वाढली आहे. रात्री अनेक ठिकाणी दव पडत असल्याचे चित्र कायम आहे. शनिवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण वगळता राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमान २० अंशांच्या खाली होते. तर कमाल तापमान २९ ते ३५ अंशांच्या दरम्यान स्थिरावले आहे.

शनिवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे २९.८ (१३.६), जळगाव ३३.७(१६.४), कोल्हापूर ३०.६ (१७.५), महाबळेश्वर २५.२(१३.२), नाशिक २९.८ (१३.६), निफाड ३०.६ (१२.४), सांगली ३१.४(१७.१), सातारा २९.९(१५.२), सोलापूर ३२.४ (१६.६), सांताक्रूझ ३४.४(२०.४), डहाणू ३४.४ (२०.०), रत्नागिरी ३४.३ (२१.३), औरंगाबाद ३०.२ (१२.९), नांदेड ३१.२ (१७.०), उस्मानाबाद - (१६.०), परभणी ३०.७ (१५.५), अकोला ३३.२ (१८.२), अमरावती ३२.६ (१५.९), ब्रह्मपुरी ३३.३ (१७.६), बुलडाणा ३०.० (१६.६), चंद्रपूर ३१.२ (१७.४), गडचिरोली ३०.४(१६.०), गोंदिया ३०.६(१६.८), नागपूर ३२.१ (१६.६), वर्धा ३२.४(१६.४), यवतमाळ ३२.५ (१५.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Industry Target: पुणे जिल्ह्यातील कृषी उद्योगाचे १२ अब्ज डॉलरचे उद्दिष्ट

APMC Contribution Waiver: दुष्काळी बाजार समित्यांचे अंशदान माफ करा : सोमवंशी

US Import Ban: कॅनडाच्या उत्पादनांवर अमेरिकेची बंदी

Farmer Diwali Relief: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देणार : बावनकुळे

Maharashtra Sugar Industry: एक नोव्हेंबरनंतरच साखर कारखाने सुरू करा: इंडियन इरिगेशन फेडरेशनची मागणी

SCROLL FOR NEXT