Dr. Sanjay Belsare Agrowon
ताज्या बातम्या

Water Management : पाणीवापर सोसायट्या बळकट करणार

Water Conservation : राज्याच्या कृषी सिंचन व्यवस्थेची जाण असलेले तसेच शेतकऱ्यांच्या पाणी विषयक समस्या समजावून घेत धोरणात्मक बदलासाठी शेतकरी व शासनात भक्कम दुवा म्हणून काम करणारा अधिकारी म्हणून डॉ. बेलसरे परिचित आहेत.

Team Agrowon

Pune News : “राज्यातील शेतकऱ्यांच्या पाणीवापर सोसायट्यांना बळकट करण्यासाठी जलसंपदा विभाग प्राधान्य देईल,” असे जलसंपदा खात्यातील लाभक्षेत्र विकास विभागाचे नवे सचिव डॉ. संजय बेलसरे यांनी सांगितले.

राज्याच्या कृषी सिंचन व्यवस्थेची जाण असलेले तसेच शेतकऱ्यांच्या पाणी विषयक समस्या समजावून घेत धोरणात्मक बदलासाठी शेतकरी व शासनात भक्कम दुवा म्हणून काम करणारा अधिकारी म्हणून डॉ. बेलसरे परिचित आहेत.

राज्याच्या पाणीवापर सोसायट्यांची चळवळ पुढे रेटण्यात गेल्या दोन दशकांपासून त्यांनी घेतलेला पुढाकार उल्लेखनीय आहे. सचिवपदी नियुक्ती झाल्याचे कळताच वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था व तिच्या सहयोगी लघु वितरिका पाणी वापर संस्थांकडून डॉ. बेलसरे यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. राज्याच्या पाणीवापर सोसायट्यांमधील शेतकरी प्रतिनिधींकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.

डॉ. बेलसरे सध्या महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे (मेरी) महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. जलसंपदा विभागातील संकल्पन, प्रशिक्षण, जलविज्ञान, धरण सुरक्षितता आणि संशोधन असे विविध विषय त्यांच्या अखत्यारित येतात. पाणीवापर सोसायट्यांचा राज्यातील पहिली प्रकल्पस्तरीय संस्था वाघाड येथे स्थापन झाली. या संस्थेने धरणातील पाण्याचे यशस्वी नियोजन करून दाखवले आहे.

लाभक्षेत्र विकास विभागाच्या सचिवपदावरून राजन शहा निवृत्त झाल्यानंतर पुढील सचिव कोण, याबाबत जलसंपदा विभागात कमालीची उत्सुकता होती. राज्य शासनाने मात्र डॉ. बेलसरे यांना सचिवपद देण्यास पसंती दिली. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी सोमवारी (ता. ६) डॉ. बेलसरे यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले.

सिंचन कायदे बदलण्यासाठी पुढाकार

डॉ. संजय बेलसरे यांनी ‘मेरी’च्या महासंचालक पदाची सूत्रे स्वीकारताच शेतकऱ्यांचा पाणीवापर व सिंचन नियोजनातील सहभाग वाढविण्यासाठी आणखी पुढाकार घेतला. त्यासाठी राज्यभर कार्यशाळा घेतल्या. सिंचनविषयक क्लिष्ट कायद्यांमध्ये बदलाची प्रक्रिया त्यांनीच सुरू केली आहे. त्यांना सचिव पद मिळाल्यामुळे अपेक्षित बदल करण्यास अधिक संधी मिळाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Census : नाशिकमध्ये मोबाईल अॅपद्वारे पशुधन गणना सुरू

NCP ajit pawar Candidate : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचीही तिसरी यादी आली समोर! तिसऱ्या यादीत फक्त चौघांचा समावेश

E-Peek Pahanai : अकोला जिल्ह्यात ८२ टक्के शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी

Paddy Market : धानाला किमान चार हजार रुपये क्‍विंटलचा दर द्या

Rabi Season 2024 : मराठवाड्यात रब्बी पेरणीची गती मंद

SCROLL FOR NEXT