Sugarcane Labors Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Labors : नरसिंहपूर परिसरात ऊसतोड मजुरांच्या राहुट्यांत पाणी

ऊसतोड मजुरांच्या राहुट्यांत पावसाचे पाणी घुसल्याने चिखल साचून चिकचिक निर्माण झाली. यामुळे त्यांना रात्र जागून काढावी लागते आहे.

टीम ॲग्रोवन

नीरा नरसिंहपूर, जि. पुणे : नरसिंहपूर (ता. इंदापूर) परिसरात परतीच्या पावसामुळे (Heavy Rainfall) सर्वांचीच दाणादाण उडाली आहे. नागरिक व जनावरांमध्ये आजारांचे प्रमाण वाढले आहे तर ऊसतोड (Crop Damage) मजुरांच्या राहुट्यांत पावसाचे पाणी घुसल्याने चिखल साचून चिकचिक निर्माण झाली. यामुळे त्यांना रात्र जागून काढावी लागते आहे.

राहुट्यांमध्ये पाणी घुसल्याने राहुट्या ओल्या झाल्याने कुटुंबातील सर्वांनाच रात्र जागून काढावी लागत आहे. जळण ओले झाल्याने स्वयंपाकही करता येत नाही. त्यामुळे त्यांना शेव, चुरमूरे, फरसाणा खावून दिवस काढण्याची वेळ आली आहे.

नीरा नरसिंहपूर परीसरात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आभाळात ढगांची गर्दी होऊन जोरदार पाऊस बरसत असून थांबायचे नाव घेताना दिसत नाही. पावसामुळे जनावरांच्या चारा व पाण्याचे मोठे हाल होऊ लागले असून विविध आजार बळावण्यास सुरुवात झाली आहे.

विविध आजारांनी तोंड काढल्याने सरकारी तसेच खासगी रुग्णालये नागरिकांनी फुल्ल झाले आहेत. दरम्यान, साखर कारखान्यांच्या गळीत हंगाम काहींनी सुरू केला असून परतीच्या पावसामुळे ऊसतोड थंडावली आहे. त्यामुळे ऊसतोड मजुरांना कामाविना बसून राहावे लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agripreneurship MOU: कृषी विद्यापीठ, सह्याद्री फार्म्समध्ये करार

Jalalakshmi Irrigation Scheme: जललक्ष्मी प्रवाही योजनेचा २३ गावांतील शेतीला लाभ

Tiger Attack Compensation: सोनवणे कुटुंबाला १० लाखांचा धनादेश

Solapur Development Projects: वारी, कॉरिडॉर, आयटी पार्कला ‘टॉप प्रायोरिटी’

Sugarcane Payments Pending: उसाचे पेमेंट न मिळाल्याने शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

SCROLL FOR NEXT