Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : पावसाने शेतांत पाणी

जिल्ह्यात पिकांचे नुकसान; पुणे शहरात ३१ मि.मी पाऊस

टीम ॲग्रोवन

पुणे : गेल्या चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण (Cloudy Atmosphere) आहे. यामुळे काही ठिकाणी दुपारनंतर वातावरणात बदल होऊन मेघगर्जनेसह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) पडत आहे. शुक्रवारी (ता.३०) सकाळी आठ वाजेपर्यंत पुणे शहरात ३१ मिलिमीटर पाऊस झाला.

या शिवाय जिल्ह्यात देखील पाऊस झाला. विविध ठिकाणी पावसामुळे शेतात पाणी साचले. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. उत्तरेकडून परतीचा पाऊस हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. त्यातच राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत आहे.

दुपारनंतर काही ठिकाणी अचानक पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊन जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडत आहे. गुरुवारी (ता. २९) दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पुणे शहर, केशवनगर या भागांत मुसळधार पाऊस झाला. पुणे शहरात ३१ मिलिमीटर, तर भोसरीत २५ मिलिमीटर पाऊस पडला.

हवेली, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, खेड, पुरंदर या तालुक्यांत तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. हवेलीतील कोथरूड, थेऊर, उरुळीकांचन, खेड, चिंचवड, हडपसर, वाघोली, मुळशीतील घोटावडे, थेरगाव,

भोरमधील नसरापूर, वेळू, संगमनेर, वेल्ह्यातील वेल्हा शहर, विंझर, जुन्नरमधील जुन्नर शहर, वडगाव आनंद, आपटाळे, खेडमधील वाडा, राजगुरुनगर, पाईट, चाकण, आळंदी आदी ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला.

पुरंदरला पावसाने झोडपले

पुरंदरमधील शहर व पंचक्रोशीला मुसळधार पावसाने झोडपले. केवळ ४५ मिनिटांच्या कालावधीत १८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. जेजुरी परिसरातही दुपारी साडेतीनच्या दरम्यान वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे बाजार करणाऱ्या नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. या जोरदार पावसाने बाजरी पिकांचे मोठे नुकसान झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT