chankapur Dam Agrowon
ताज्या बातम्या

Chankapur Dam : चणकापूर धरण भरूनही जलसंकट कायम

Team Agrowon

Nashik News : ऑगस्ट महिना संपत आला तरी देखील तालुक्यासह कसमादेत समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळाचे ढग अधिक गडद होत आहेत. मालेगाव शहरासह कसमादेतील लहान मोठ्या ५२ पाणीपुरवठा योजनांना वरदान ठरलेले चणकापूर धरण ८७ टक्के भरत आले आहे.

धरणातील उपलब्ध पाणी ३१ जुलैपर्यंत पुरवावे लागणार असल्याने या योजनांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पावसाअभावी पाणीपुरवठा योजना देखील संकटात आल्या आहेत. मालेगाव शहराला दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता दोन दिवसाआड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मालेगावला, चणकापूर व गिरणा या दोन्ही धरणातून पाणीपुरवठा केला जातो. चणकापूर व पुनंद ही दोन्ही धरणे साधारणत: ऑगस्टमध्ये भरतात. त्यापूर्वी दोन्ही धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग होऊन गिरणा नदी पात्रातून पाणी गिरणा धरणात जाते. हरणबारी ओव्हरफ्लो झाले असले तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस नसल्याने मोसमनदीला पूरपाणी आलेले नाही.

परिणामी यावर्षी गिरणा धरण आत्तापर्यंत जेमतेम ३७ टक्के भरले आहे. त्यामुळे गिरणा धरणातून शहराला मर्यादित पाणी उचलावे लागणार आहे. चणकापूर धरण ८७ टक्के भरले असले तरी देखील यावर्षी धरणातून पुरेसा विसर्ग झालेला नाही. पंधरा दिवसांपूर्वी धरणातून काही प्रमाणात विसर्ग झाला.

गिरणा नदीला आलेल्या पूरपाण्यातून ठेंगोडा उंचावणीच्या बंधाऱ्यात पाणी साचले. डाव्या कालव्याद्वारे हे पाणी तळवाडे तलावात पोहोचले. तळवाडे तलावात ६८ दशलक्ष घनफूट जलसाठा असून कालव्याचे पाणी बंद झाल्याने पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे. यातूनच महापालिका प्रशासनाने दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

पूरपाणी नसल्याने संकटात भर

दरवर्षी कसमादेतील धरणे भरण्याच्या आधी (१५ ऑगस्टपर्यंत) किंवा भरल्यानंतर मोठ्या प्रमाणावर धरणांमधून विसर्ग होतो. गिरणा व मोसम या दोन्ही नद्या किमान दोन महिने वाहतात. यातून गिरणा धरण भरण्यास मदत होते. पूरपाण्यामुळे गिरणा उजवा व डावा हे दोन्ही कालवे किमान तीन महिने वाहतात. याचा मालेगावसह लहान-मोठ्या ५२ पाणीपुरवठा योजनांसह लाभ क्षेत्रातील शेतीला फायदा होता.

आवर्तन लवकर घ्यावे लागणार

गिरणा नदीचे पूरपाणी संपले तरी देखील ठेंगोडा उंचावणीच्या बंधाऱ्यात साचलेले पाणी तळवाडे तलावासह अनेक पाणीपुरवठा योजनांना दिलासा देते. गेल्या चार वर्षापासून चणकापूरमधून पहिले आवर्तन घेण्यास फेब्रुवारी महिना उजाडला होता.

यावर्षी पाऊस रुसला तर धरणातून नवे आर्वतन लवकर घ्यावे लागेल. एकूणच दुष्काळी परिस्थितीबरोबरच पाणीटंचाईचा सामना देखील करावा लागणार आहे.पाऊस पडावा यासाठी शेतकऱ्यांसह सर्वच घटक तसेच महसूल प्रशासनाचे अधिकारी आस लावून बसले आहे.

धरणाचे नाव -- साठवण क्षमता -- साठा -- (ता.२६ अखेर) टक्केवारी

चणकापूर २,४२७ २,१०१ ८७

हरणबारी १,१६६ १,१६६ १००

केळझर ५७२ ५७२ १००

नाग्यासाक्या ३९७ ०० ००

गिरणा १८,५०० ६,८८५ ३७

पुनंद १,३०६ ९२० ५६

माणिकपुंज ३३५ ०० ००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Management : भातावरील कडाकरपा रोगाचे व्यवस्थापन

Silk production : पंजाब स्वत:चा रेशीम ब्रँड बाजारात आणणार; रेशीम दिनानिमित्त लाँच केला 'लोगो'

Fish Conservation : तलाव, मत्स्य संवर्धनासाठी महिला गटांचा पुढाकार

Bird Conservation : पर्यावरण, धनेश पक्षी संवर्धनाचा ‘संकल्प’

Weekly Weather : राज्यात ईशान्य मॉन्सून दाखल

SCROLL FOR NEXT