Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : वाशीम जिल्ह्यात खरिपाची सुधारित पैसेवारी ४७ पैसे

या खरीप हंगामात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले असून, त्याचा परिणाम उत्पादकतेवर दिसून येत आहे. शासकीय यंत्रणांनी काढलेल्या खरीप सुधारीत पैसेवारी त्यामुळे ५० पैशांच्या आत आली आहे.

Team Agrowon

वाशीम ः या खरीप हंगामात (Kharip Season) अतिवृष्टीने (Wet Drought) पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले असून, त्याचा परिणाम उत्पादकतेवर दिसून येत आहे. शासकीय यंत्रणांनी काढलेल्या खरीप सुधारीत पैसेवारी त्यामुळे ५० पैशांच्या आत आली आहे. सर्व तहसीलदारांकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील एकूण ७९३ महसूल गावांची सरासरी पैसेवारी ४७ पैसे इतकी आली आहे.

वाशीम जिल्ह्यात यंदाच्या मोसमात पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. सरासरीच्या १०० टक्क्यांवर पाऊस झाला. अनेक मंडलांमध्ये अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले. खरीप हंगामासाठी यंत्रणांनी केलेल्या अहवालानुसार पैसेवारीचा अहवाल तयार करण्यात आला.

यानुसार आता वाशीम तालुक्यात १३१ गावांमध्ये ४७ पैसे, मालेगाव तालुक्यातील १२२ गावांत ४८ पैसे, रिसोड तालुक्यातील १०० गावांची ४६ पैसे, मंगरूळपीर तालुक्यातील १३७ गावांची ४७ पैसे, कारंजा तालुक्यात १६७ गावांत ४७ आणि मानोरा तालुक्यात १३६ गावांत ४७ पैसेवारी आढळून आली. जिल्ह्यातील ७९३ गावांतील प्रमुख पिकांची सुधारित पैसेवारी ४७ पैसे आलेली आहे. या सुधारित पैसेवारीच्या प्रस्तावास जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी मान्यता दिली आहे.

शेतकऱ्यांना मदत मिळेना

वाशीम जिल्हा ओल्या दुष्काळाच्या सावटात असल्याने शेतकरी शासकीय मदतीच्या आशेवर बसले होते. दिवाळीआधी प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्यात येईल हे प्रशासनाचे आश्‍वासन मात्र हवेत विरले आहे. अद्यापही असंख्य शेतकरी खात्यात अनुदान जमा होण्याची प्रतीक्षा करीत आहेत.

जिल्ह्यात सतत तीन महिने अतिवृष्टीने थैमान घातले होते. यामुळे जिल्ह्यातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. सोयाबीन ७० टक्के नष्ट झाले. खरिपाचे सोयाबीन पीक अतिवृष्टीत नष्ट झाले. आता रब्बीची पेरणी शासकीय मदतीवर होईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. जिल्हाधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मदत जलदगतीने मिळण्याची अपेक्षा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान धन धान्य योजनेला मान्यता; २४ हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार

Urban Issues: शहरातील नागरी समस्यांकडे मनपाने गंभीरपणे द्यावे लक्ष

Kharif Rain: पेरणी झालेल्या पिकांना पावसाची गरज

Artificial flowers: कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालावी

Agrowon Podcast: पपई दर टिकून; आले चढ-उतारात, काकडीला उठाव, उडीद व कापूस दर दबावात

SCROLL FOR NEXT