Warehouse Corporation Agrowon
ताज्या बातम्या

वखार महामंडळाचे गोदाम जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारणार

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचा ६५ वा वर्धापन दिन शनिवारी (ता. २०) विभागीय कार्यालयातर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास औरंगाबाद, जालना व बीड या जिल्ह्यांतील सर्व वखार केंद्रांचे गोदाम व्यवस्थापक, संगणक तंत्रज्ञ त्याच बरोबर व्यापारी, शेतकरी, विविध शासकीय व खासगी कंपन्यांचे ठेवीदार मोठ्या प्रमाणात कार्यक्रमास उपस्थित होते.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : वखार महामंडळाचे (Warehouse Corporation) गोदाम जाळे (Warehouse Network) औरंगाबाद विभागात मोठ्या प्रमाणात विस्तारणार असल्याचे प्रतिपादन वखार महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक राजेंद्र भिसे (Rajendra Bhise) यांनी केले.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचा ६५ वा वर्धापन दिन शनिवारी (ता. २०) विभागीय कार्यालयातर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास औरंगाबाद, जालना व बीड या जिल्ह्यांतील सर्व वखार केंद्रांचे गोदाम व्यवस्थापक, संगणक तंत्रज्ञ त्याच बरोबर व्यापारी, शेतकरी, विविध शासकीय व खासगी कंपन्यांचे ठेवीदार मोठ्या प्रमाणात कार्यक्रमास उपस्थित होते.

महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक श्री. भिसे म्हणाले, की वखार महामंडळाची गोदामे विभागात अपुरी पडत आहेत. वारंवार भाड्याची गोदामे घ्यावी लागतात. प्रस्तावित असलेल्या करोडी-वाळूज परिसर, औरंगाबाद येथे व जांबरगाव तालुका वैजापूर येथे नव्याने गोदामे उभारणे व ॲग्रो लॉजिस्टिक पार्क समृद्धी महामार्गालगत उभारणी चालू आहे. तसेच जालना येथील ड्रायपोर्ट येथे १० एकर जागा घेऊन आधुनिक गोदाम सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. बीड जिल्ह्यात लवकरच नव्याने जागा घेऊन नगर-परळी रेल्वेमार्गावर गोदामे बांधण्याचे प्रस्तावित आहे. शेतकऱ्यांना शेतीमाल साठविण्यास जागा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

विभागातील ३ जिल्ह्यांत सार्वजनिक अन्नधान्य वितरण प्रणालीचे काम वखार महामंडळ साठवणूक सेवा पुरवून सुरळीतपणे सुविधा देत आहे. या कार्यक्रमात भारतीय अन्न महामंडळाचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. वाले, अंबुजा सिमेंटचे विभागीय व्यवस्थापक महेंद्र शर्मा, व्यापारी ठेवीदार धनंजय मोताळे, शेतकरी ठेवीदार भाऊसाहेब पवार यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. तसेच विभागातील उत्कृष्ट वखार केंद्र व गुणवंत कर्मचाऱ्यांचा विभागीय प्रमुख राजेंद्र भिसे यांच्या हस्ते महामंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रवीण भाबड व राजदीप जत्ती यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने विभागातील अधिकारी, कर्मचारी, ठेवीदार प्रतिनिधी, शेतकरी व्यापारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Flood Fishermen Compensation: पूरग्रस्त मत्स्य व्यावसायिकांना चार कोटींची भरपाई मंजूर

CPIM Protest: बीड जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

Crop Loan Rates: पीकनिहाय कर्जदर निश्चित

Sugarcane Payments Pending: साखर कारखान्यांकडे अडकले शेतकऱ्यांचे ८७६ कोटी रुपये

Jowar Prices Low: ज्वारीला कमी दर; शेतकरी आर्थिक अडचणीत

SCROLL FOR NEXT