Vegetables Agrowon
ताज्या बातम्या

Vegetable Rate : शहरांमध्ये आवक घटल्याने भाज्यांचे दर कडाडले, आणखी वाढ होण्याची शक्यता

Tomato Rate : टोमॅटो, मिरची यासह कोथिंबिर आणि पालेभाज्यांचे दरात किलोमागे तब्बल २० ते ३० रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

sandeep Shirguppe

Vegetable Rates : देशभरातील भाजीपाला उत्पादक पट्ट्यात मागच्या दोन महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा  खूपच कमी पाऊस झाला. यामुळे पीक उत्पादनावर मोठा परिणाम झाला. परिणामी टोमॅटो, मिरची, कोथिंबीर यासह अन्य पालेभाज्यांच्या दरात किलोमागे तब्बल २० ते ३० रुपयांची वाढ झाली. मुंबईसारख्या महानगरांमध्ये झालेली वाढ जास्त आहे.

एप्रिल महिन्यात झालेला पाऊस आणि त्यानंतर जून महिन्यातील पावसाची दडी याचा टोमॅटो पिकावर परिणाम झाला. तसेच जूनमध्ये गुजरात, राजस्थान आणि शेजारच्या भागाता चक्रीवादळामुळे टोमॅटो पिकाला पावसाचा फटका बसला होता.

जूनच्या शेवटी आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात अनेक भागांमध्ये पाऊस झाला. यामुळे बाजारातील टोमॅटो आवक कमी झाली. परिणामी टोमॅटोचे सरासरी दर १०० रुपयांच्या पुढे गेले. तर काही बाजारांमध्ये किरकोळ भाव जवळपास १८० रूपयांपर्यंत पोहोचला आहे. याचबरोबर काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आले, हिरवी मिरची, हिरव्या वाटाण्यासह अन्य सर्वच भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तर महाराष्ट्रातील मुंबई, पुणे या जिल्ह्यात सर्वच भाज्यांचे किलोमागे २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे.

दरम्यान पुढच्या काही दिवसात श्रावण सुरू होणार आहे. याचबरोबर यंदा अधिक मास आल्याने दोन महिने श्रावण असणार आहे. या काळात शाकाहारीला जास्त महत्व असल्याने भाज्या आणि फळांना मोठी मागणी असते परंतु पुरेसा माल बाजार उपलब्ध होत नसल्याने भाज्यांचे दर भविष्यात आणखी काही दिवस असेच राहण्याची शक्यता आहे.

अशातच मुसळधार पावसामुळे टोमॅटोबरोबरच कोबी, फ्लॉवर, काकडी आणि हिरव्या भाज्यांच्या दरातही वाढ झाली आहे. हिमाचल प्रदेशात भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्गासह शेकडो रस्ते बंद झाल्याने भाजीपाल्याची वाहतूक ठप्प झाली आहे. उत्तरेकडील राज्यांत अतिवृष्टीमुळे भाज्यांची उभी पीके नष्ट झाल्याने आवक थांबली आहे. यामुळे दराचा भडका उडाला आहे.

मुंबई मार्केटमधील एक किलो टोमॅटोला सध्या १५० ते १८० भाव आहे. मिरचीला १४० रूपये, तर आले(अद्रक) ९० ते १०० कोथिंबीर एक पेंडी ३०, भेंडी ६० रूपये किलो, कोबी ८० रूपये किलो, वांगी ६० रूपये किलो, शिमला मिरची ६० रूपये किलो, भविष्यात शिमला मिरचीचे दर आणखी वाढण्याची भिती आहे. हिरवे वाटाणे ११० रुपये किलो, चवळी १०० ते ६० रुपये किलो असा दर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Energy: अमरावती जिल्ह्यात घरकुलांमध्ये मिळणार सौर ऊर्जेचा लाभ

Crop Insurance: सरासरी पैसेवारी ५० पैशांच्या आत

Flaxseed Farming: धान उत्पादक चंद्रपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांची जवसाला पसंती

Summer Moong Crop: कमी कालावधीत येणारे उन्हाळी मुगाचे ९ वाण

Soybean Procurement: सांगलीत दोन केंद्रांवर सतराशे क्विंटल सोयाबीन खरेदी

SCROLL FOR NEXT