Solapur KVK  Agrowon
ताज्या बातम्या

Solapur KVK : सोलापूरच्या ‘केव्हीके’ला वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्कार

Agriculture Day : नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कृषी दिनाच्या निमित्ताने पंचवटी नाशिक येथे ऍग्रो केअर मंच, नाशिकच्या वतीने हा कार्यक्रम आयोजिला होता.

Team Agrowon

Solapur News : सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्राला स्वर्गीय वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्कार- २०२३ हा मानाचा राज्यस्तरीय कृषी पुरस्कार कृषी दिनाच्या निमित्ताने विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे संचालक कृषी शिक्षण व अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.

कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ, डॉ. लालासाहेब तांबडे यांना नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कृषी दिनाच्या निमित्ताने पंचवटी नाशिक येथे ऍग्रो केअर मंच, नाशिकच्या वतीने हा कार्यक्रम आयोजिला होता.

यावेळी भूषण निकम, प्रसिद्ध अभिनेते दीपक शिर्के, चेअरमन महाकृषक -क्लस्टरचे मा. श्री राजेंद्र देवरे व संचालक सौ. रोहिणी पाटील आदी उपस्थित होते.

कृषी विज्ञान केंद्राने गेल्या २७ वर्षांमध्ये कृषी विस्तार व कृषी शिक्षणाच्या माध्यमातून शेती आणि शेतकऱ्यांसाठी दिलेले योगदान, ग्रामीण युवकांना कृषी आणि कृषी पूरक विषयांचे प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार निर्मितीमध्ये केलेले महत्वाचे कार्य, शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार,

नावीन्यपूर्ण विस्तार कार्यक्रम व महिला सबलीकरण या अनुषंगाने केलेल्या कार्याची दखल घेऊन कृषी विज्ञान केंद्र सोलापूरला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी अभिनंदन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

Agriculture Admission 2026: कृषी शिक्षण प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीला सुरुवात

Farmer Children Protest: एकरकमी एफआरपीसाठी शेतकरी पाल्यांचे आंदोलन

Prof. Yasmin Sheikh Dies: ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे निधन

SCROLL FOR NEXT