Animal Husbandry Department Agrowon
ताज्या बातम्या

Diploma In Veterinary Science : ‘डिप्लोमा इन व्हेटरनरी सायन्स’वर तातडीची बैठक

Animal Husbandry : महाराष्ट्र पशू व विज्ञान विद्यापीठाअंतर्गत तीन वर्षे कालावधीचा पशुसंवर्धन विषयक पदविका अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून सुरु करण्याचे प्रस्तावित होते.

Team Agrowon

Nagpur News : महाराष्ट्र पशू व विज्ञान विद्यापीठाअंतर्गत तीन वर्षे कालावधीचा पशुसंवर्धन विषयक पदविका अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून सुरु करण्याचे प्रस्तावित होते. मात्र काही संघटनांचा आक्षेप आणि त्या पार्श्‍वभूमीवर काही लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या विरोधी भूमिकेमुळे ही प्रक्रिया रखडली होती. आता या विषयावर उद्या (ता.२२) पुणे विधान भवन परिसरात बैठक होणार आहे.

राज्यात सध्या दहावीनंतर दोन वर्षे कालावधीचा पशुसंवर्धन अभ्यासक्रम आहे. तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या कार्यकाळात डिप्लोमा अभ्यासक्रमात पशुसंवर्धनसह पशुविज्ञानाचा समावेश करावा, असे परिपत्रक काढण्यात आले.

एका समितीच्या अहवालावरून हे काम झाले. त्यानंतर विद्यमान पशुसंवर्धनमंत्र्यांनी बारावीनंतर तीन वर्षांचा इंग्रजी माध्यमातील ‘डिप्लोमा इन व्हेटरनरी सायन्स’ अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला. यंदाच्याच सत्रापासून त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना त्यांनी नियुक्‍त समितीच्या बैठकीत केली. त्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्याचे निर्देश ‘माफसू’ला देण्यात आले.

शिक्षण शाखेचे अधिष्ठाता डॉ. अनिल भिकाने यांच्या नेतृत्वात अभ्यासक्रम तयार होऊन त्याला शैक्षणिक परिषदेची मान्यताही मिळाली. ही सर्व प्रक्रिया झाल्याने यंदाच्या सत्रात त्याची अंमलबजावणी होईल, असे वाटत होते. मात्र काहींच्या विरोधामुळे या प्रक्रियेला स्थगिती देत पूर्वीप्रमाणेच दहावीच्या अर्हतेवरील पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे काम सुरु झाले होते.

याबाबत ‘ॲग्रोवन’मधून मंगळवारी (ता.२०) वृत्त प्रकाशित करण्यात आले. त्याची तडकाफडकी दखल घेत या विषयावर उद्या (ता.२२) पुणे विधानभवन परिसरात दुपारी १२ वाजता पशुसंवर्धनमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे.

बैठकीच्या अजेंड्यावर केवळ या अभ्यासक्रमाचा विषय आहे. पशुसंवर्धन आयुक्‍त, ‘माफसू’चे कुलगुरू, अभ्यासगट समितीचे सदस्य, विषयाशी संबंधित अधिकारी, संस्था चालकांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmers: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त अकोल्यात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम

Soybean Fodder Seized: कारंजा तालुक्यात २६० टन सोयाबीन कुटार जप्त; १० कारखान्यांना नोटिसा

Orange Orchards Crisis: पाण्याअभावी संत्रा बागा संकटात; वाशीममधील शेतकऱ्यांची चिंता वाढली

Mango Variety Research: नवसारी कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर महाराष्ट्रातील शिष्टमंडळाकडून पाहणी

Agricultural Labour Protest: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ५ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत पिठलं-भाकरी आंदोलन

SCROLL FOR NEXT