Rajan Salvi
Rajan Salvi Agrowon
ताज्या बातम्या

Barsu Refinery Protest : रिफायनरीला समर्थन देणाऱ्या आमदार साळवींचा यू-टर्न

Team Agrowon

Barsu Refinery Update : बारसू येथे येऊ घातलेल्या रिफायनरीला मी जाहीर समर्थन दर्शविले होते, परंतु आंदोलकांना दिलेली वागणूक माझ्या जिव्हारी लागली आहे. उद्धव ठाकरे माझे दैवत आहेत, त्यामुळे पक्षप्रमुख जो आदेश देतील तो आपल्याला मान्य असेल, असा यू-टर्न घेत आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी रिफायनरीच्या समर्थनाची भूमिका मागे घेतली.

बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राज्यात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. चार दिवसांपूर्वी माती परीक्षणादरम्यान आंदोलक काम रोखण्यासाठी धडकल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला होता.

अमानुषपणे मारहाण केल्याने त्याचे संतप्त पडसाद सर्वत्र उमटले. त्यानंतर प्रथमच राजन साळवी प्रसार माध्यमांना सामोरे गेले. मंगळवारी (ता. २) आठवडा बाजार येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

साळवी म्हणाले, ‘‘मी जेव्हा रिफायनरीला समर्थन दिले होते. तेव्हा खासदार विनायक राऊत यांनी बारसूचा दौरा केला. मी देखील तेथे होते. परंतु माझ्याबाबत स्थानिकांमध्ये रोष होता. म्हणून मी पुढे गेलो नाही. परंतु उशिरा राजापूर पोलिस ठाण्यात जाऊन खासदार राऊत व अन्य सहकाऱ्यांची भेट घेतली.

झालेला सर्व प्रकार मनाला वेदना देणारा आहे. राजापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी माझी भूमिका जाहीर केली. त्यानंतर माझ्याविरोधात चार गावांमध्ये रोष निर्माण झाला होता. माझी भूमिका ही स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देण्याची होती. ज्या पद्धतीने पोलिसांनी आंदोलकांना लाठीमार केला हा प्रकार मनाला वेदना देणारा होता.

मी माझ्या भूमिकेवर ठाम होतो. जनतेशी संवाद साधून प्रशासन यातून मार्ग काढेल, असे मला वाटले होते. मात्र तसे न होता आंदोलकांना ज्या पद्धतीने मारहाण झाली त्याचे समर्थन मी करू शकत नाही. माझ्या समर्थनाच्या भूमिकेवरून मी मागे येतो. ६ मे रोजी उद्धव ठाकरे बारसूमध्ये येणार आहेत. ते जे आदेश देतील तो मला मान्य आहे.

दरम्यान, भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार म्हणाले, ‘‘रिफायनरी प्रकल्पासंदर्भात कोकणवासीयांच्या भावनांशी सुरू असलेला खेळ सर्वांनी थांबवावा. आम्ही लाचार नाही तर स्वाभिमानी आहोत. शासनाने चार दिवसांत जमिनीला दर जाहीर करावा. जमीन दिली तर प्रकल्प होईल नाहीतर दुसरीकडे जाईल.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : पाणीटंचाईची सर्वाधिक झळ महिलांनाच

Interview with Vikas Patil : शेतकऱ्यांनी केवळ युरियाचा आग्रह धरू नये

Village Story : वळवाचा पाऊस...

Turmeric Cultivation : हळद लागवडीची पूर्वतयारी

Finland Banking System : फिनलँडमधील सक्षम सहकारी बँकिंग व्यवस्था

SCROLL FOR NEXT