Labor Shortage Agrowon
ताज्या बातम्या

Labor Shortage : शेती मजुरीच्या दरात यंदा वीस टक्के वाढ

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : शेतीची मशागत करण्यासाठी लागणाऱ्या मजुरांच्या दरात साधारण २० टक्क्यांनी यंदा वाढ झाली आहे. मजुर टंचाई आणि मागणी अधिक यामुळे मजुरीचे दर वाढले आहेत. वाढत्या महागाईमुळे मजुरीत वाढ झाली आहे. यांत्रिक शेती करताना इंधनाचे वाढते दरही परवडणारे नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.

नगर जिल्ह्यासह राज्याच्या बहुतांश भागात अलीकडच्या काही दिवसापासून मजुरांच्या दरात वाढ झाली आहे. खरिपात साधारण बाजरी, खरीप ज्वारी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, कापूस, सोयाबीन, यासह उसाचीही लागवड होत असते.

अपवाद वगळता राज्यातील काही भागात यंदा मॉन्सूनचा पाऊस उशिराने झाला. त्यामुळे यंदा पेरण्याला साधारणपणे १५ दिवस उशीर झाला. खरिपात प्रामुख्याने तूर, मूग, उडीद, बाजरी, कापूस, सोयाबीनचे पीक आहे.

चांगल्या पावसामुळे ३१ जुलैअखेर १२३ लाख हेक्टरच्या पुढे खरीप पेरा झाला आहे. उशिराने पेरण्या, कापूस लागवड झाली असली तरी आता पिके वाढीच्या स्थितीत आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची खुरपणी, कोळपणी, खत टाकणी यासह इतर शेती मशागतीची कामे उरकण्याची लगबग सरू आहे.

दरम्यान, पावसाने उघडीप दिल्याने सर्वच ठिकाणी एकाचवेळी कामे आलेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मजूर टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अलीकडे अनेक शेतकरी यंत्रिकीकरणाचा वापर करत असले तरी यंत्रासाठी लागणाऱ्या इंधनाचे वाढते दरही परवडणारे नाहीत.

काही कामे केवळ मजुरानेच करावी लागतात. मात्र मजुरीचे वाढते दर आणि त्यांच्या टंचाईमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अन्य भागांतून जादा मजुरी देऊन मजूर आणावे लागतात. त्यांच्या जाण्या-येण्यासाठीचा खर्च शेतकऱ्यांना वेगळा करावा लागत आहे. खास करून सोयाबीन, कापूसपट्ट्यात मजुरीबाबत शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी येत आहेत.

...असे आहेत दर (रुपयांत) (कंसात पूर्वीचे दर)

- पुरुष मजूर ः ५०० ते ६०० (३०० ते ४००)

- महिला मजूर ः ३०० ते ३५० (२०० ते २५०)

- फवारणी ः ४०० (२५० ते ३००)

- बैल मशागत ः ७०० एकरी (४५० एकरी)

- टॅक्टर मशागत ः १८०० एकरी (१५०० एकरी)

परिसरात पूर्वी २०० रुपये रोजंदारीने काम करणाऱ्या महिला मजुराला आता ३०० ते ४०० रुपये तर पुरुषाला ५०० ते ६०० रुपये प्रति दिवसाची रोजंदारी द्यावी लागत आहे. मजुराची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे बाहेरगावाहून वाहनाद्वारे मजुरांची ने-आण करावी लागत आहे.
- बाळासाहेब मरकड, शेतकरी, दहिगाव-ने (ता. शेवगाव, जि. नगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT