Sugar factory
Sugar factory Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Season : पुणे विभागात चोवीस साखर कारखाने सुरू

Team Agrowon

पुणे ः गळीत हंगाम (Sugarcane Season) सुरू होऊन जवळपास महिना होत आला आहे. या कालावधीत साखर कारखान्यांनी (Sugar Factory) गाळप बऱ्यापैकी केले आहे. पुणे विभागात सहकारी आणि खासगी अशा एकूण ३१ पैकी २४ कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे, अशी माहिती प्रादेशिक कार्यालयातील सूत्रांनी दिली.

चालू वर्षी १५ ऑक्टोबरपासून साखर कारखान्यांनी गळीत हंगामास सुरूवात केली. मात्र तरीही साखर कारखाने हळूहळू सुरू होत आहेत. परतीच्या पावसाने गळीत हंगामात काही प्रमाणात अडचणी आल्या. अनेक ठिकाणी उसात पाणी साचल्याने ऊसतोड बंद ठेवावी लागली. त्यामुळे गळीत हंगाम धिम्या गतीने सुरू होत आहे. जुलैपासून फडात पाणी राहिल्याने उसाची फारशी वाढ झाली नसल्याने उत्पादनात घट होत आहे.

पुणे विभागात सातारा, पुणे भागांत उसाच्या तीन लाख हेक्टरपर्यंत लागवडी झाल्या असल्याची स्थिती आहे. त्यापैकी यंदा गाळपासाठी सुमारे दोन लाख ७४ हजार १९६ हेक्टरवरील ऊस उपलब्ध आहे. सध्या सुरू कारखान्यांमध्ये सहकारी १२ व खासगी १२ साखर कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता एक लाख ७२ हजार ४०० टन आहे.

गाळपात ‘बारामती अॅग्रो’ची आघाडी

सुरू झालेल्या २४ कारखान्यांनी २४ लाख ६५ हजार ६०६ टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून २० लाख १० हजार ४० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उतारा सरासरी ८.१५ टक्के आहे. गाळपात बारामती अॅग्रोने आघाडी घेतली आहे. या कारखान्याने तीन लाख २४ हजार ६३० टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून दोन लाख २६ हजार ३०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. तर साखर उतारा सरासरी ६.९७ टक्के आहे. कराडमधील रयत साखर कारखान्याने साखर उताऱ्यात आघाडी घेतली आहे. या कारखान्याचा उतारा १०.४५ टक्के आहे.

सुरू झालेले साखर कारखाने

श्रीराम सहकारी, सह्याद्री, रयत, गुरू कमोडिटी, जयवंत, ग्रीन पॉवर, स्वराज, शरयू, खटाव, सोमेश्वर, दि माळेगाव, श्री. छत्रपती, विघ्नहर, कर्मयोगी शंकरराव पाटील, श्री. संत तुकाराम, घोडगंगा, भीमा-शंकर, नीरा-भीमा, श्रीनाथ म्हस्कोबा, अनुराज, बारामती अॅग्रो, दौंड शुगर, व्यंकटेशकृपा, पराग अॅग्रो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT