Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : बारा हजार शेतकरी विम्यापासून वंचित

निलंगा तालुक्यातील चित्र ः फसवणूक केल्याची भावना

Team Agrowon

निलंगा ः खरीप हंगामातील सोयाबीन या नगदी पीकाचे नुकसान (Crop Damage) होऊन शेतकरी आडचणीत सापडला असताना किमान पीकविमा (Crop Insurance) तरी भरघोस मिळेल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत होते मात्र विमा कंपनीने तुटपुंजा विमा शेतकऱ्यांच्या पदरात टाकून एकप्रकारे फसवणूक केल्याची भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत असून अद्याप निलंगा तालुक्यातील १२ हजारांपेक्षा शेतकरी विम्यापासून वंचित राहिले आहेत. पीकविमा कधी मिळणार याची प्रतिक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.

यंदाचा खरीप हंगाम जणू शेतकऱ्यांच्या समोर संकटे घेऊन आला आहे की काय असेच चित्र यंदा पहावयास मिळाले. सुरुवातीला गोगलगायींचा प्रादुर्भाव त्यानंतर आॕगस्ट महिन्यात झालेला ढगफुटी सदृश्य पाऊस, लगेच मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव अन शेवटी परतीचा पाऊस अशा संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. जवळपास ८० टक्के सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. महसूल विभागाने पंचनामे करून जवळपास निलंगा तालुक्यातील ६० हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहितीवरून त्यांना नुकसान भरपाई मिळाली.

राज्य सरकारने जाहीर केलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. विम्यासाठी ७२ तासाच्या आत विमा कंपनीला कळवणे आवश्यक असल्याची माहिती शेतकऱ्यांना कळविण्यात आली होती. त्यानुसार शेतकऱ्यांनी माहितीही विमा कंपनीला आॕनलाईन कळवली. विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी गावोगावी पंचनामेही केले. वीमा कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या समोर पंचनामा लिहून ८० व नव्वद टक्के नुकसान दाखवले मात्र प्रत्यक्षात १५ ते ३० टक्के नुकसान भरपाई कांही शेतकऱ्यांना मिळाली आहे.

पीकविम्यातून तोंडाला पुसली पाने

हेक्टरी ८ ते १५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकले गेले आहेत शिवाय विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले असून निलंगा तालुक्यातील एक लाख नऊ हजार शेतकऱ्यांनी विमा भरला होता तेवढ्याच शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती विमा कंपनीला कळवली होती काही शेतकऱ्यांना पीक वीमा मंजूर होऊन तो वितरित करण्यात आला. मात्र अद्याप १२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात वीम्याची रक्कम जमा झाली नसल्याने ते चिंतातूर झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Subsidy : २०२३ च्या कांदा अनुदानासाठी २८ कोटी रुपये मंजूर; शासन निर्णय प्रसिद्ध

Hydrogen Fuel cooking: आता हायड्रोजन इंधनावर स्वयंपाक शक्य

Heavy Rain: दमदार पावसाने ४६ हजार हेक्टरवरील पिकांना संजीवनी

Agriculture Success: तांत्रिक व्यवस्थापनातून फळबाग शेतीत समृद्धी

Dairy Business: दुग्ध व्यवसायाने पालटेल विदर्भाचे चित्र

SCROLL FOR NEXT