Kharif Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing: तुरीची लागवड ६० टक्क्यांनी माघारली; सोयाबीन २६ तर कापूस ११ टक्क्यांनी कमी

Team Agrowon

Pune News : माॅन्सून हंगामाचा सव्वा महिना उलटला तरी देशातील खरिप लागवडीचे चित्र समाधानकारक नाही. गेल्यावर्षीच्या तुलनेत खरिपाचा पेरा जवळपास ९ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. कडधान्याचा पेरा सर्वाधिक २६ टक्क्यांनी माघारला. तर तेलबिया आणि कापूस लागवड पिछाडीवर आहे, असे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अहवालातून स्पष्ट झाले.

चालू हंगामात तुरीला चांगला भाव मिळत आहे. तुरीचे भाव सध्या सरासरी ९ हजार ते १० हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. त्यामुळे तुरीच्या दरात सुधारणा होईल, असा अंदाज होता. पण महाराष्ट्र आणि कर्नाटकातील तूर पट्ट्यात लागवडयोग्य पाऊस नाही.

त्यामुळे लागवडी कमी दिसतात. सध्या तुरीची लागवड गेल्यावर्षीपेक्षा ६० टक्क्यांनी पिछाडीवर आहे. ७ जुलैपर्यंत देशात ५४ लाख हेक्टरवर तुरीची लागवड जाली होती. गेल्या हंगामात यात काळातील लागवड १५ लाख हेक्टरवर होती.

देशात यंदा माॅन्सूनचा पाऊस देशभरात पोचण्यास उशीर झाला. बहुतांशी भागात माॅन्सूनच उशीरा दाखल झाला. जून महिन्यात देशभरात पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. मागील चार ते पाच दिवसांपासून अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे.

त्यामुळे खरिपाच्या पेरण्या चालू हंगामात पिछाडीवर दिसतात. देशात आतापर्यंत ३५३ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. मागील हंगामात याच काळातील पेरणी ३८७ लाख हेक्टरवर होती. म्हणजेच यंदा गेल्यावर्षीपेक्षा खरिपाची पेरणी ९ टक्क्यांनी पिछाडीवर आहे.

एकूण कडधान्याचा पेरा २६ टक्क्यांनी कमी दिसतो. गेल्याहंगामात ७ जुलैपर्यंत ४४ लाख हेक्टर कडधान्याखाली आले होते. ते यंदा केवळ ३३ लाख हेक्टर आहे. उडादाची लागवडही ३० टक्क्यांनी कमी आहे. मुगाच्या लागवडीत अडीच टक्क्यांची वाढ दिसते.

भरडधान्य लागवडीत मात्र २० टक्क्यांची वाढ आहे. बाजरी आणि ज्वारी पेरणीत वाढ जास्त आहे. बाजरीची लागवड आतापर्यंत ६० टक्क्यांनी अधिक आहे. आतापर्यंत ३८ लाख ४५ हजार हेक्टरवर बाजरी आहे. गेल्याहंगामात २४ लाख हेक्टर या काळात बाजरीखाली होते.

ज्वारी पेरणीत ४५ टक्क्यांची वाढ दिसत असल्याने एकूण भरडधान्य क्षेत्र जास्त दिसते. ज्वारीखाली आतापर्यंत ६ लाख हेक्टर आले. गेल्या हंगामात केवळ ४ लाख हेक्टरवर पेरा होता. मका लागवड मात्र १२ टक्क्यांनी कमी आहे. ७ जुलैपर्यंतचा विचर करता यंदा २७ लाख हेक्टर तर मागील हंगामात ३१ लाख हेक्टरवर पेरा होता.

सोयाबीन लागवड २६ टक्क्यांनी पिछाडीवर

देशात आजपर्यंत झालेल्या लागवडीचा विचार करता, तेलबियांची पेरणी १४ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. यंदा सव्वादहा लाख हेक्टर कमी क्षेत्र दिसतं. गेल्या हंगामात ७१ लाख ३० हजार हेक्टरवर तेलबिया पेरा होता. तो सध्या ६१ लाख हेक्टरवर दिसतो. तेलबियामध्ये महत्वाच्या सोयाबीनची पेरणी २६ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. सध्या जवळपास ३६ लाख हेक्टरवर पेरा आहे. गेल्या हंगामात याच काळातील पेरणी ४८ लाख हेक्टरवर होती.

कापूस लागवड ११ टक्क्यांनी पिछाडीवर

चालू खरिप हंगामात भाताची लागवड आतापर्यंत २४ टक्क्यांनी कमी दिसते. गेल्या हंगामात याच काळात ७१ लाख हेक्टरवर भात होता. मात्र यंदा केवळ ५४ लाख हेक्टर भाताखाली आले. ऊस लागवडीत ५ टक्क्यांची वाढ होऊन ५६ लाख हेक्टरवर क्षेत्र पोचले. मात्र कापूस लागवड ११ टक्क्यांनी कमी दिसते. सोयाबीनची लागवड आतापर्यंत ७१ लाख हेक्टरवर झाली. मागील हंगामात याच काळातील क्षेत्र ७९ लाख हेक्टर होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT