Sugar Factory Election Agrowon
ताज्या बातम्या

Cooperative Election : आदिवासी कारखाना निवडणूक २० डिसेंबरपर्यंत स्थगित

डोकारे (ता. नवापूर) येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ऐन रंगात आली असताना शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना २० डिसेंबरपर्यंत स्थगिती दिल्याने पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.

Team Agrowon

नवापूर, जि. नंदुरबार : डोकारे (ता. नवापूर) येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक (Cooperative Sugar Factory Election) ऐन रंगात आली असताना शासनाने (Government) सहकारी संस्थांच्या निवडणुकांना (Election) २० डिसेंबरपर्यंत स्थगिती दिल्याने पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.

राज्यात सद्य:स्थितीत सात हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सुरू असलेला सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम व सात हजार १४७ सहकारी संस्थांचा निवडणुकीचा कार्यक्रम हे एकाच कालावधीत असल्याने जास्तीत जास्त मतदारांना निवडणुकीत सहभाग नोंदविता यावा यासाठी सहकारी संस्थांच्या निवडणुका या ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर २० डिसेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत.

त्यामुळे तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २० डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग मंत्रालयाने २९ नोव्हेंबरला आदेश पारित केला.

डोकारे साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी ३ डिसेंबरला मतदान होते. शेतकरी विकास पॅनल व परिवर्तन विकास पॅनल समोरासमोर लढत होती. प्रचाराला रंगत चढली होती. दोन दिवसांवर मतदान येऊन ठेपले असताना निवडणूक प्रक्रियेला स्थगिती आल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाल्याचे बोलले जात आहे; मात्र या स्थगितीमुळे प्रचाराला अधिक वेळ मिळणार असल्याने काही उमेदवार आनंदात असल्याचे दिसून आले.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सद्यःस्थितीत सात हजार १४७ इतक्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रमदेखील सुरू झाला आहे. संस्थांपैकी ‘अ’ वर्ग ३८, ‘ब’ वर्ग एक हजार १७०, ‘क’ वर्गातील तीन हजार १५१ व ‘ड’ वर्गातील दोन हजार ७८८ सहकारी संस्था आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marathwada Water Storage: मराठवाड्यातील ८९४ प्रकल्पांत ७९.७५ टक्के पाणीसाठा

Sesame Farming: उन्हाळी तीळ लागवडीचे शास्त्रीय तंत्र

Animal Health Tips 2026: वार अडकण्याची कारणे अन् उपाय

UPI Payment: ‘युपीआय’ची दशकपूर्ती

Agriculture Research: आद्य संशोधक शेतकरीच!

SCROLL FOR NEXT