Organic Farming  Agrowon
ताज्या बातम्या

Organic Farming : शेतीमाल प्रक्रिया उद्योग, सेंद्रिय शेती पद्धतीविषयी प्रशिक्षण

ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसह महिला व शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत त्यांना शाश्वत अर्थार्जनाचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आत्मा पुरस्कृत ग्रामीण युवकांसाठी कौशल्य आधारित ‘सेंद्रिय शेती पद्धती व शेतीमाल प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण दिले जात आहे.

Team Agrowon

वाशीम ः ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसह महिला व शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचे (Self Employment) साधन उपलब्ध करून देत त्यांना शाश्वत अर्थार्जनाचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आत्मा पुरस्कृत ग्रामीण युवकांसाठी कौशल्य आधारित ‘सेंद्रिय शेती (Organic Farming) पद्धती व शेतीमाल प्रक्रिया उद्योग (Food Processing Industry) प्रशिक्षण दिले जात आहे.

या प्रशिक्षणाचे उद्‍घाटन गुरुवारी (ता. ५) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एम. तोटावार यांच्या हस्ते झाले. कृषी संशोधन केंद्राचे डॉ. आर. एम. अंबेनगरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संजय खंबायत, ‘आत्मा’चे जिल्हा समन्वयक एस. टी. राऊत, तर कृषी विज्ञान केंद्राचे नोडल अधिकारी डॉ. एस. के. देशमुख, शास्त्रज्ञ टी. एस. देशमुख, शुभांगी वाटाणे उपस्थित होते.

एस. एम. तोटावार यांनी `जमिनीचे आरोग्य व सेंद्रिय शेतीचे महत्त्व` या विषयावर मार्गदर्शन करताना विषमुक्त अन्न, सात्त्विक आहाराची जागरूकता, रोग व्यवस्थापनाकरिता ट्रायकोडर्माचा वापर व एकूणच शेतीतील खर्च कमी करून व्यावसायिक दृष्टिकोन शेतकऱ्यांनी बाळगावा, असे आव्हान केले. शेती गट पद्धतीने करून घरच्या घरी सेंद्रिय निविष्ठा उत्पादित कराव्या व नियोजनावर विशेष भर द्यावा, असे ते म्हणाले.

डॉ. अंबेनगरे यांनी हवामान बदलामुळे शेती तसेच पूरक व्यवसायावर होणाऱ्या विपरीत परिणामाबाबत सजग होत जिद्द, चिकाटी, मेहनत व सुविधा उपलब्ध असल्यास उद्योजक घडण्यात वेळ लागत नाही. यासाठी युवकांनी पुढाकार घेऊन विविध पदार्थांपासून मूल्यवर्धन करून स्वतःचे ब्रॅंड तयार करीत विक्री करावी असे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT