Grafting Robot  Agrowon
ताज्या बातम्या

Grafting Robot : रोबोटद्वारे फळ, भाजीपाल्याच्या कलमीकरणाचे प्रशिक्षण

ग्राफ्टिंग रोबोटच्या माध्यमातून कमी मनुष्यबळात, कमी वेळात जास्त प्रमाणात दर्जेदार रोप कलमांची निर्मिती करणे शक्य होणार आहे.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
परभणी ः ग्राफ्टिंग रोबोटच्या माध्यमातून कमी मनुष्यबळात, कमी वेळात जास्त प्रमाणात दर्जेदार रोप कलमांची (Grafting) निर्मिती करणे शक्य होणार आहे.

विद्यापीठाच्या वतीने ग्राफ्टिंग रोबोटवर (Grafting Robot) संशोधन व प्रशिक्षण कार्य करण्यात येणार आहे, हे तंत्रज्ञान नर्सरी चालक, बागायतदार शेतकरी यांना उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा (Dr. Indra Mani Mishra) यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील भारतीय कृषी संशोधन परिषद आणि जागतिक बँक पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) अंतर्गत दोन दिवसीय ग्राफ्टिंग रोबोट यावर सोमवारपासून (ता. २०) दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

कार्यशाळेच्‍या उदघाटनप्रसंगी डॉ. मिश्रा बोलत होते. या वेळी प्राचार्य डॉ. यू. एम. खोडके, नाहेप प्रकल्प प्रमुख डॉ. गोपाळ शिंदे, इंजि. डी. व्ही. पाटील, डॉ. गोदावरी पवार, डॉ. डी. डी. टेकाळे आदींची उपस्थिती होती.

यात जपान देशातील हेल्पर रोबोटेक कंपनीचे तज्ज्ञ प्रशिक्षण देणार आहेत. या वेळी नाहेप प्रकल्पाअंतर्गत खरेदी केलेल्‍या ग्राफ्टिंग रोबोटेचे उद्‍घाटन कुलगुरू डॉ. मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले.

रोबोटच्या माध्यमातून दिवसामध्ये तीन हजार रोपांचे कलमीकरण होते. या कार्यशाळेत ग्राफ्टिंग रोबोटवर केकेके जपान येथील संशोधक डॉ. ई. एस. शिवशंकर, मुरा कोशी आणि जुगो मिनोहरा मार्गदर्शन करणार असून आठ हजार रोपांचे कलमीकरण करण्‍यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Protest : तात्काळ मदतीची मागणी! दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांचे उद्यापासून बेमुदत उपोषण

Soybean Seed Storage : सोयाबीन बियाणे सुरक्षित ठेवण्यासाठी कृषी तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

Turmeric Crops : हळद उत्पादक शेतकरी हवालदिल! करप्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे हळद पीक आले अडचणीत

Amravati Teachers Constituency : अमरावती शिक्षक निवडणूक: शिक्षकांच्या मतांवर कोणाचा ताबा? मतविभाजन ठरणार निर्णायक

FFS App Fertilizer Booking : खत खरेदी आता झाली डिजिटल; २२ तारखेपासून घरबसल्या करा ऑनलाईन बुकिंग

SCROLL FOR NEXT