Landslide  Agrowon
ताज्या बातम्या

Matheran Landslide : भूस्खलनामुळे पर्यटकांना बंदी

Matheran Heavy Rain : अतिवृष्‍टीमुळे माथेरानमधील घाटरस्‍त्‍यावर दोनदा दरड कोसळण्याच्या घटना घडल्‍या आहेत. आता मालडुंगा पॉइंटवर भूस्खलन झाल्‍याने रस्त्याचा काही भाग खचला.

Team Agrowon

Raigad News : अतिवृष्‍टीमुळे माथेरानमधील घाटरस्‍त्‍यावर दोनदा दरड कोसळण्याच्या घटना घडल्‍या आहेत. आता मालडुंगा पॉइंटवर भूस्खलन झाल्‍याने रस्त्याचा काही भाग खचला. डोंगरावरून चिखलयुक्‍त पाण्याचा प्रवाह वाढल्‍याने हा पॉइंट पर्यटकांसाठी बंद केला असून, त्‍या ठिकाणी कर्मचारी तैनात केले आहेत.

माथेरानमध्ये एकूण ३८ पॉइंट्स आहेत. याठिकाणी जाणाऱ्या पायवाटेतील काही भाग खचला असून मुसळधार पावसामुळे पाणी जाण्याचा मार्ग बंद झाल्याने भूस्खलन झाले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे. दोन दिवसांपासून पाण्याबरोबरच माती वाहून जात आहे. जंगलातील झाडेही उन्मळून पडली आहेत.

भूस्खलन झाल्याची माहिती मिळताच नगरपालिकेचे अभियंता अभिमन्यू येळवंडे, पालिका अधीक्षक अंकुश इचके, पर्जन्यमापक निरीक्षक अन्सार शेख, स्वच्छता निरीक्षक नरेंद्र सावंत आदींनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली आणि पॉइंट पर्यटकांसाठी बंद केला.

वनराईचे नुकसान

मालडुंगा पॉइंट माथेरानच्या पश्चिमेला असून या भागात कोणतीही वस्ती नाही. त्‍यामुळे भूस्‍खलनात कोणतीही जीवित वा वित्त हानी झालेली नाही, मात्र हा भाग वनराईचा असल्‍याने झाडांचे नुकसान झाले आहे.

माथेरानच्या मालडुंगा पॉइंट भागात जमीन खचली आहे. ही माहिती मिळताच पथकासह घटनास्थळी पाहणी करून योग्य त्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. हा पॉइंट सुरक्षेच्या कारणास्तव रहदारीसाठी बंद केला आहे.
- अभिमन्यू येळवंडे, अभियंता, माथेरान नगरपरिषद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ginger Research Center: आले संशोधन केंद्राचा पेच; कृषिमंत्र्यांच विधानपरिषदेत बैठकीचं आश्वासन 

Silk Market : बीड रेशीम कोष बाजारात शेतकऱ्यांचे शोषण

Turmeric Market : नांदेडला हळदीचे चुकारे थकल्याने लिलाव पाडले बंद

Agriculture Mechanization : टिलरने वाढले शेतकऱ्यांचे बळ

Agrowon Podcast: तुरीचा बाजार मंदीतच; हळदीला मर्यादीत उठाव, कांदा स्थिर, गवार तेजीत, तर कोबीची आवक कायम!

SCROLL FOR NEXT