Vikramgad News : विक्रमगड तालुका हा पालघर जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. बहुतांशी लोकसंख्या आदिवासी आहे; तर तालुक्याचा बराचसा भाग जंगलव्याप्त डोंगराळ आहे. येथील डोंगररांगा पर्यटकांना खुणावत आहेत.
पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिकांना रोजगार मिळत आहे. अनेक आदिवासी महिला रस्त्याशेजारी रानभाजी विक्री करताना दिसतात. तसेच रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांचाही धंदा तेजीत आहे.
विक्रमगडच्या पूर्वेला जव्हारचा घाट, वतवड्याचा सुळका अन्. कोहोज किल्ला दिसतो; तर महालक्ष्मी डोंगराच्या अलीकडे व पूर्व-पश्चिमेला मातेरा डोंगर दिसतो. या डोंगराच्या सखल भागात देहर्जे खोऱ्यात विक्रमगड वसले आहे. त्यामुळे विक्रमगडमध्ये पावसाळ्यात पर्यटकांची पावले आपोआप वळतात.
इथल्या डोंगररांगा, धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. गेल्या तीन महिन्यांत पावसाळी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे इथल्या रोजगारालाही चालना मिळाली आहे.
विक्रमगड तालुक्याचा बहुतांश भूप्रदेश हा समतल असून जमीन जांभा खडकापासून बनलेली आहे. तालुक्यातील शेतजमीन सुपीक असल्याने शेती व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर आहे. मुंबईसारखे शहर नजीक असल्याने फुलशेती / भाजीपाला पिकांची लागवड दिवसेंदिवस वाढत आहे. या भाजीपाला विक्रीतून आदिवासींचा उदरनिर्वाह चालतो.
धार्मिक पर्यटनासाठी देखील पसंती
विक्रमगड हे निसर्ग पर्यटनाबरोबरच धार्मिक पर्यटनासाठीदेखील प्रसिद्ध आहे. विक्रमगडमधील पिंजाळ नदीकिनारी श्री पंतगेश्वराचे महादेव मंदिर आहे. पांडवकालीन श्री नागेश्वर शिवमंदिरात श्रावण सोमवारी भाविकांची गर्दी होते.
तसेच विक्रमगडपासून १६ किमी अंतरावर कावळे या ठिकाणी श्री पिंजाळेश्र्वर हे शिव मंदिर आहे. या ठिकाणी प्रशस्त मठ बांधण्यात आला आहे. विक्रमगड तालुका आदिवासीबहुल आहे. त्यामुळे तालुक्याला आदिवासी संस्कृती लाभलेली आहे. यात वारली चित्रकला, तारपा नाच, ढोल नाच, गौरी नाच, कोंबडा नाच आदी कला आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.