Turdal Rate agrowon
ताज्या बातम्या

Turdal Rate : तूर डाळीचे दर भडकले; १८० रूपये किलो दराने विक्री, सरकार नियंत्रण आणणार का?

Wheat, Rice, Turdal Rate : अवकाळी पावसाने देशातील अनेक पिकांवर मोठा परिणाम झाला. गहू, तांदूळ, यासह तूर उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.

Team Agrowon

Turdal Price : मागच्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसाने देशातील अनेक पिकांवर मोठा परिणाम झाला. गहू, तांदूळ, यासह तूर उत्पादनावर याचे गंभीर पडसाद उमटले आहेत. दरम्यान यंदा देशात तूरीचे उत्पादन घटल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे तूर डाळीचे दर भडकण्याची शक्यता आहे. किरकोळ बाजारात तूरडाळीचे दर प्रतिक्विंटल १६ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

यंदा तूरीचे ४८ लाख उत्पादन अपेक्षित तर यातील ३३ लाख टन देशाला गरज आहे. तूर डाळीबरोबर देशात सर्वाधिक घेतल्या जाणाऱ्या ज्वारी पिकाचेही उत्पादन घटल्याने ज्वारीचेही दर वाढले आहेत. चांगल्या मालाला साडेसात हजार रुपये क्विंटल ज्वारीचा दर झाला आहे.

दरम्यान गेल्या हंगामात देशात तुरीचे बंपर पीक होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. तशी पेरणीही झाली होती मात्र, काढणीच्या काळात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे देशात सरासरी १५ लाख टनाने तुरीचे उत्पादन घटले. वर्षभर तूरडाळ तेजीत राहणार आहे.

गेल्या वर्षी ऐन काढणीच्या वेळेला जोरदार पाऊस कोसळल्याने तूरीचे दाणे काळे पडून खराब झाले. यामुळे उत्पादन घटल्याने दर तेजीत राहिले. त्यात यंदा मान्सून उशिरा सुरू झाल्याने कडधान्यांसह ज्वारी, भाताच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. यामुळे यंदा गहू, तांदूळ, ज्वारीबरोबर आता तूर डाळ महाग झाली आहे.

तूरडाळीचे दर वाढत असल्याने केंद्र सरकारने आयात शुल्क माफ करत परदेशातील तूरडाळ भारतात आणण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत मात्र, मुळात तिथेच तेजी असल्याने येथे आणून विक्री कशी करायची, असा प्रश्न आहे.

दरम्यान होलसेल आणि किरकोळ व्यापारी स्वानंद चौगुले (तेली) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागच्या दोन महिन्यात तूर डाळीच्या दरात सातत्याने वाढ झाली. १२० रुपये होलसेल तर किरकोळ विक्री १३० रुपये प्रमाणे असलेली तूर डाळ या महिन्यात १५० ते १७५ रुपये किलोपर्यंत गेली. दरम्यान आज (ता.१७) उत्तम प्रतिची तूरडाळ १८० रुपये प्रमाणे विक्री होणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

याचबरोबर गेल्या वर्षी तुरीचे उत्पादन घटल्याचा परिणाम सध्या बाजारावर दिसतो आहे. नवीन पीक कसे येते यावरच आगामी काळातील दर अवलंबून राहणार असल्याची माहिती तेली यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Government Fund Utilization: मार्चअखेर ‘लेट नाईट’ विनियोग

Mango Farmers: बागायतदार शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून व्याजसवलत

Hailstorm Crop Damage : गारपीटग्रस्त कांदा पिकासाठी उपाययोजना

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल

Onion Procurement Scam: कांदा खरेदीमध्येही भोंदू खरातचा महाघोटाळा

SCROLL FOR NEXT