Rajganga Sugar : नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या मागील गाळप हंगामातील ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि अन्य देणी अद्याप थकीत असल्याने शेतकरी संघटनेने राजगंगा शुगर ग्रुपला इशारा दिला आहे. .नाशिक तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सुमारे चार कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा दावा संघटनेने केला आहे. तसेच बँक कर्मचारी व अन्य देणी धरून कारखान्याकडील एकूण थकबाकी सुमारे १७ कोटी रुपयांपर्यंत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.कामाख्या देवीला पावसासाठी प्रार्थना, चांगल्या पावसासाठी उपाय, कामाख्या देवी मंत्र, दुष्काळ निवारण पूजा, शेती समृद्धीसाठी प्रार्थना, कामाख्या माता मंदिर, पाऊस पडण्यासाठी मंत्र, वरुण राजाला साकडे, धार्मिक पाऊस विधी, कामाख्या देवी उपासना, निसर्ग आणि अध्यात्म, मान्सूनसाठी प्रार्थना, कामाख्या देवी शक्तीपीठ, शेतकऱ्यांची प्रार्थना, सुख समृद्धीसाठी तोडगे.Agriculture: फुलंब्री तालुक्यात कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर.या पार्श्वभूमीवर माजी खासदार हेमंत आप्पा गोडसे, शेतकरी संघटनेचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष शंकरराव ढिकले आणि माजी सभापती अनिल ढिकले यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजगंगा शुगर ग्रुपचे प्रतिनिधी राजाराम घावटे यांची भेट घेऊन निवेदन दिले..War Impact on Agri: खत, तेल, कापूस, सोयाबीन, मक्याच्या भावावर परिणाम होणार.नाशिक सहकारी साखर कारखाना २०२४-२५ च्या गाळप हंगामात राजगंगा ग्रुपने चालविला होता. गाळप केलेल्या उसाची देय रक्कम वेळेत न मिळाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. शेतीची मशागत, पुढील हंगामाची तयारी तसेच कुटुंबाच्या दैनंदिन गरजांसाठी ऊसबिलाची रक्कम आवश्यक असल्याचे शेतकरी संघटनेने निवेदनात म्हटले आहे..‘‘आमचे पैसे थकले आहेत, तुमचे पैसेही थकू देऊ नका’’१८ ऑक्टोबरपर्यंत थकीत रक्कम अदा न झाल्यास सोलापूर जिल्ह्यात राजगंगा ग्रुपने चालविण्यास घेतलेल्या साखर कारखान्यावर आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. नाशिक तसेच पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तेथे जाऊन संबंधित कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करतील. ‘‘आमचे पैसे थकले आहेत, तुमचे पैसेही थकू देऊ नका; या कारखान्याला ऊस देऊ नका,’’ असा प्रचार करण्याचा इशारा संघटनेने दिला. दरम्यान, भेटीदरम्यान राजाराम घावटे यांनी १८ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांची थकीत रक्कम अदा करण्याचे आश्वासन दिल्याचे शेतकरी संघटनेने सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.