Tomato Production Agrowon
ताज्या बातम्या

Tomato Production : पांगरीत वेळेआधीच टोमॅटो पिकू लागले

गजानन कदम यांनी एक एकरमध्ये टोमॅटोची लागवड केली होती. नांदेड शहरातील एका कृषी निविष्ठा विक्रेत्याकडून संशोधीत टोमॅटो बियाणे खरेदी केले होते.

Team Agrowon

नांदेड : टोमॅटोचे (Tomato) फळ लहान अवस्थेत असताना वेळेपूर्वीच पिकत (Tomato Ripening) आहेत. यात कंपनीकडून निकृष्ट बियाणे दिल्याची तक्रार पांगरी (ता. अर्धापूर) येथील शेतकरी गजानन कदम यांनी अर्धापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे केली आहे.

गजानन कदम यांनी एक एकरमध्ये टोमॅटोची लागवड केली होती. नांदेड शहरातील एका कृषी निविष्ठा विक्रेत्याकडून संशोधीत टोमॅटो बियाणे खरेदी केले होते. या बियाणांची रोपे तयार करून सप्टेंबरमध्ये लागवड केली.

या टोमॅटोच्या झाडाची फळे मोठी होण्यापूर्वीच अकाली पिकत आहेत. सदरील बियाणे निकृष्ट निघाल्यामुळे आपले दीड ते दोन लाखांचे नुकसान झाल्याची तक्रार गजानन कदम यांनी तालुका कृषी अधिकारी अनिल शिरफुले यांच्याकडे केली आहे.

निवेदनात या प्रकरणी चोकशी करून कंपनीवर कारवाई करण्यात यावी. तसेच भरपाई देण्याची मागणी केली आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षकांना देण्यात आली आहे.

बियाणे कंपन्यांची बोगसगिरी

जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत असताना बियाणे कंपन्यांकडून बोगसगिरी केली जात आहे. यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. अशा प्रकारामुळे शेतकऱ्यांना उत्पादन मिळणे दूरच त्यांचा उत्पादन खर्चही वाया जात आहे.

टोमॅटो बियाणे उत्पादक कंपनीने शेतकऱ्यांचे अपेक्षीत उत्पादन लक्षात घेऊन भरपाई द्यावी, अन्यथा कंपनीला धडा शिकवू, असा इशारा संभाजी ब्रिगेड किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे यांनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT